News34chandrapur
वरोरा - विदर्भ साहित्य संघाची वरोरा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत करण्याच्या उद्देशाने कवी नीरज आत्राम, आनंदवन चौक वरोरा यांचे घरी सभेचे आयोजन करण्यात आले.
या सभेमध्ये सर्व आजीवन सदस्यांच्या अनुमतीने तसेच प्रमुख उपस्थितीत वरोरा तालुका शाखा कार्यकारिणी गठीत करण्यात आली.ती खालीलप्रमाणे
या सभेमध्ये सर्व आजीवन सदस्यांच्या अनुमतीने तसेच प्रमुख उपस्थितीत वरोरा तालुका शाखा कार्यकारिणी गठीत करण्यात आली.ती खालीलप्रमाणे
तालुका कार्यकारिणी अध्यक्ष नरेंद्र कन्नाके, उपाध्यक्ष सीमा वैद्य, कार्याध्यक्ष शिरीष दडमल, सचिव नीरज आत्राम, सहसचिव सौ.भारती लखमापूर, कोषाध्यक्ष आरती रोडे, संघटक कु. ज्योती चन्ने, प्रसिद्धी प्रमुख परमानंद तिराणिक, संपर्क प्रमुख गणेश पेंदोर, सल्लागार दीपक शिव, डॉ. प्रकाश महाकाळकर, सदस्य सतीश डांगरे, जितेश कायरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे. या कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांचे डॉ. श्याम मोहरकर, चंद्रपूर तसेच सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.