News34 chandrapur
पुणे - सध्याच्या ऑनलाइन युगात झपाट्याने बातम्या मिळविण्याचं एकमेव स्थान म्हणजे News portal, या माध्यमातून जगात कुठेही घडणाऱ्या घटना अवघ्या काही सेकंदात आपल्या मोबाईल वर बघायला मिळतात. Pune crime news
पण कधी या झपाट्याच्या युगात काम करतेवेळी अनेकजण बेकायदेशीर मार्गाचा वापर करतात.
असेच एक प्रकरण पुणे येथील पिंपरी चिंचवड मध्ये उघडकीस आले आहे.
वेबपोर्टल मध्ये काम करणारा पत्रकार 30 वर्षीय रामदास पोपट तांबे एक दिवस भोसरी पोलीस ठाण्यात आपली प्रेयसी बेपत्ता असल्याची तक्रार देतो, पोलीस घटनेची दखल घेत त्या तरुणीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यानंतर पोलीस तपासात भयावह बाबी उघडकीस येतात.
सदर प्रकरण पोलिसांनाही अवाक करून सोडते.
रामदास तांबे याची प्रेयसी मैत्रीण ओडिशा राज्यातील 28 वर्षीय चंद्रमा सीमांचल मुनी ही काही दिवसांपासून भोसरी परिसरात राहत होती.
रामदास व चंद्रमा या दोघांची चांगली ओळख होती, चंद्रमा च्या वडिलांच्या नावावर असलेले 2 फ्लॅट व रोख आणि दागिने मला माझ्या नावावर करायचे आहे, त्याकामी मला मदत कर, अन्यथा तुला लैंगिक अत्याचार प्रकरणात फसविणार अशी धमकीवजा मागणी चंद्रमा ने रामदास कडे केली.
नेहमी होणारी धमकीवजा मागणी व वारंवार होणाऱ्या वादाला कंटाळून रामदास च्या मनात भयावह योजना आली त्याने चंद्रमा ला कायमचे संपवायचे असा निर्णय घेतला. Crime murder
तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने भोसरीपासून काही अंतरावर असणाऱ्या केळगाव परिसरात फिरण्यासाठी नेले आणि तिथेच तिची हत्या केली. इतकेच नव्हे तर चंद्रमा ची हत्या केल्यावर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट रामदास ने लावली होती. त्यानंतर भोसरी पोलिसात मैत्रीण बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
पोलिसांनी घटनेची दखल घेत तरुणीचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसांना संशय आल्याने संपूर्ण प्रकरणाचा तपास तक्रारदाराभोवतीच केंद्रित केला. तक्रारदार असलेल्या रामदास तांबे याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
