News34 chandrapur
चंद्रपूर/मुंबई - शिंदे गटाचे 16 आमदार बाद ठरले तर काँग्रेसचे 22 आमदार तयार आहे, असा गौप्यस्फोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
शिवसेना पक्षात एकनाथ शिंदेसह 40 आमदारांनी बंड पुकारत महाविकास आघाडी सरकार पाडले, त्यानंतर शिवसेनेने 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली.
सध्या या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे, जर 16 आमदार अपात्र ठरले त्यानंतर आपण सत्तेत राहू यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी कांग्रेस पक्षाचे 22 फोडले असल्याचा दावा माजी खासदार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस हे हुशार माणूस आहे, सध्या कांग्रेसची भारत जोडो यात्रा असल्याने आमदार गप्प आहे, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने आमदार अपात्र झाल्यास कांग्रेसचे आमदार भाजपच्या गळ्यात जाणार असल्याचा गौप्यस्फोट माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.