News34 chandrapur
राजुरा - चंद्रपूर जिल्ह्यात अवैध धंदे जसे कोंबडा बाजार, जुगार क्लब व सट्टा पट्टी चे हे काही नवे नाही.
2 वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात खुलेआम कोंबडा बाजार सुरू होता, काही महिन्यांपूर्वी दुर्गापूर येथे खुलेआम सट्टा व जुगार क्लब सुरू होता.
Gambling chandrapur
Gambling chandrapur
पण हे कुणाच्या आशीर्वादाने? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.
नागपूर परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्यामुळे सध्या अवैध धंदे काही प्रमाणात बंद असले तरी काही गुपचूप सुरू आहे.
राजुरा तालुक्यातील जोगापूर जंगलात मोठ्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धाड मारीत 7 लाख 59 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. Chandrapur police
या धाडीत तावडीत सापडलेले आरोपी यांची विशेष बाब आहे, जुगार भरविणारा गोलू ठाकरे हा जुगार व अवैध धंद्यातील मोठा खेळाडू आहे.
कितीही पोलीस कारवाया झाल्या तरी गोलू झुकेगा नही अशी त्याची भूमिका असते. Forest gambling
15 नोव्हेंम्बरला पहाटे 2 वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या 3 पथकांनी जोगापूर जंगलात धाड मारली.
यामध्ये 11 जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात असून आरोपी 53 वर्षीय रा. वणी हाफिज रहमान खलील रहमान (सट्टा किंग), 54 वर्षीय अनिल तुळशीराम खोब्रागडे रा. बाबूपेठ, 55 वर्षीय सैफुद्दीन उर्फ नन्हे शाह रा. राजुरा, 38 वर्षीय दीपक गणपत पडोळे रा. अंचलेश्वर गेट, चंद्रपूर, 50 वर्षीय राकेश गणपत पडोळे, 42 वर्षीय मनोज उद्धव कायडींगे, 35 वर्षीय गणेश रामदास सातफाडे, क्रिकेट सट्टा किंग व फरार आरोपी 41 वर्षीय प्रदीप गंगमवार, बाल्या उर्फ आनंद किसन बट्टे, शंकर विश्वनाथ पेटकर, एजाज खान अजीम खान, गोलू उर्फ ईश्वर सुधाकर ठाकरे या सर्व आरोपींवर जुगार प्रतिबंधक कायद्यांव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्व आरोपिकडून 5 मोबाईल हँडसेट, 6 मोटार सायकल, जुगाराचे साहित्य व रोख 3 लाख 92 हजार 110 रुपये असा एकूण 7 लाख 59 हजार 110 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
विशेष म्हणजे या गुन्ह्यातील आरोपी जुगार व सट्टा या धंद्यातील राजा आहे, 13 तारखेला T20 वर्ल्ड कप फायनल मॅच वर जुगार खेळताना स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली होती, त्यामध्ये प्रदीप गंगमवार हा आरोपी पसार झाला होता.
मात्र 15 नोव्हेंम्बरला गंगमवार हा आरोपी राजुरा येथील जोगापूर जंगलात जुगार खेळताना आढळून आला.
अवघ्या काही तासात आरोपीना बेड्या ठोकणारी स्थानिक गुन्हे शाखा गंगमवार ला ताब्यात घेऊ शकली नाही.
राजुरा येथे अनेक वर्षांपासून अवैध जुगार क्लब मोठ्या प्रमाणात सुरू आहे, तेलंगणा राज्यातील अनेक जुगार खेळणारे मोठ्या प्रमाणात राजुर्यात येतात, मागील वर्षी तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जुगार अड्ड्यावर धाड मारली होती, त्या कारवाई पोलीसांसोबत जुगार्याची झटापट झाली होती.
राजुरा येथे जुगार खेळणारे सर्व आरोपी अवैध धंद्यात गुंतलेले आहे. या सर्व आरोपींची जुगाराच्या क्षेत्रात खेळण्याची व्याप्ती मोठी आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक रीना जनबंधु, पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जितेंद्र बोबडे, सपोनि मंगेश भोयर, सपोनि संदीप कापडे, स्वामीदास चालेकर, सुरेंद्र महतो, प्रदीप मडावी, गणेश भोयर, प्रशांत नागोसे, प्रमोद डंभारे, चंदू नागरे, अजय बागेसर, गणेश मोहूर्ले, गोपीनाथ नरोटे, विनोद जाधव यांनी केली.