News34 chandrapur
चंद्रपूर - 31 ऑगस्ट ला महाकाली कॉलरी येथून एक कर्मचारी सेवानिवृत्त झाला होता, मात्र त्यावेळी ग्रॅच्युएटी ची रक्कम कमी निघत असल्याने धांडे यांनी त्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली, मात्र धांडे यांनी मी तुच्या ग्रॅच्युएटी ची रक्कम वाढवून देऊ शकतो मात्र त्या कामासाठी 50 हजार रुपये खर्च येणार असे सांगितले. CBI raid in chandrapur
फिर्यादी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत CBI नागपूर येथे तक्रार नोंदविली.
तक्रारीची पडताळणी केल्यावर CBI च्या चमूने सापळा रचला. Bribe
त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून 50 हजार रुपयांची लाच घेताना धांडे यांना रंगेहात अटक करण्यात आली. Wcl (Western coalfields limited)
सदर कार्यवाही सीबीआईचे डीआईजी एम.एस.खान यांच्या मार्गदर्शनात डीवायएसपी संदिप चोगले यांच्या नेतृत्वात डीवायएसपी नीरज कुमार गुप्ता , दिनेश तलपे , पुलिस निरीक्षक विनोद कराले , विजय उइके , विनोद खुजुर , नितिन जानोरकर , अजय वासनिक , दिनेश राठौड़ ने केली.
