News34 chandrapur
चंद्रपूर - भ्रष्टाचार मुक्त भारत, संपूर्ण स्वराज आणि व्यवस्था परिवर्तन या तीन मुद्द्यांवरती राजकारणात उतरणारी आम आदमी पार्टी या पक्षाने मागील नऊ वर्षात भारतीय राजकारणातील राजकीय विश्लेषणकर्त्याना अंचबित करून ठाकले, दिल्ली पाठोपाठ पंजाब आणि आता गुजरात मध्ये सुध्दा आम पार्टी म्हणजेच आप गुजरात चा जनतेवर आपली छाप पाडण्यात यशस्वी होताना दिसत आहे. Aap chandrapur
हे केवळ दिल्ली पंजाब गुजरात पुरतेच नसून आता महाराष्ट्रात सुध्दा आम आदमी पार्टी ला जनता मोठया प्रमाणात समर्थन देत असून येणाऱ्या काळात सत्तारूढ पक्ष विरुध्द आप असे चित्र महाराष्ट्रात सुद्धा पाहायला मिळणार आहे. याकरिता जिल्हयातील आप चे पदाधिकारी कार्यकर्ते पक्ष वाढविण्याकरिता जोमाने कामाला लागलेले आहेत.

काल चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील बाबुपेठ येथील टॉवर टेकडी वार्ड येथे आप चे शहर सचिव राजू शंकरराव कुडे यांचा मार्गदर्शनात तसेच अमीत भसारकर यांचा नेतृत्वात असंख्य युवकांनी आप मध्ये पक्ष प्रवेश घेतला तसेच वार्ड कमिटी सुध्दा स्थापन करण्यात आली यावेळेला आपचे जिल्हा युवा अध्यक्ष मयूर भाऊ राईकावार, शहर सचिव राजू भाऊ कुडे, महिला संघटन मंत्री सुजाता बोदेले, राजवर्धन बोदेले, कृष्णा जी सहारे, सुशांत धकाते, अनुप तेलतुंबडे, रोहित मेश्राम, प्रिया गेडाम, अमीत भसारकर, निखील सुटे, प्रमोद बोदेले, सूजल भसारकर, ज्योती ताई असे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.