News34 chandrapur
गोंदिया - जिल्हा परिषद गोंदिया मधील अभियंत्यांना 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक झाल्याने एकच खळबळ उडाली.
जिल्हा परिषद गोंदिया येथे जलजीवन मिशन अंतर्गत वैयक्तिक नळ कनेक्शन जोडणीचे ग्राम पिंडकेपार व कन्हारटोला येथील केलेल्या कामाचे MB बुक व देयकावर सही करून मंजुरी च्या कामासाठी विभागीय कार्यालय जिल्हा परिषद गोंदिया येथे पाठविण्याकरिता ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता व उपविभागीय अधिकारी यांना 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. Bribery
फिर्यादी हे लाखनी जिल्हा भंडारा येथील रहिवासी आहे, त्यांनी पाणीपुरवठा विभागातील नळ कनेक्शन जोडणीचे देयके मंजूर करण्यासाठी 57 वर्षीय शाखा अभियंता दामोदर जगन्नाथ वाघमारे व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद गोंदिया मधील उपविभागीय अधिकारी 55 वर्षीय नृपालसिंह अजाबसिंह जतपेले रा. चंद्रपूर यांनी फिर्यादीला 15 हजार रुपयांची लाच मागितली.
फिर्यादीला पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रार दिली. Gondia acb trap
तक्रारीची पडताळणी केल्यावर सापळा रचला, 23 नोव्हेंम्बरला आरोपी यांनी 9 हजार व 6 हजार असे एकूण 15 हजार रुपये वाघमारे यांच्याकडे देण्यासाठी सांगितले असता लाचेची रक्कम स्वीकारताना वाघमारे यांना रंगेहात अटक करण्यात आली असून पंचासमक्ष दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. Zilla parishad gondia
दोघांविरुद्ध गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. Acb trap
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, ला.प्र.वि. नागपूर, मधुकर गिते, अप्पर पोलीस अधीक्षक ला प्र वी नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, पोलीस निरीक्षक अतुल तवाडे,स.फौ. चंद्रकांत करपे, विजय खोब्रागडे पो. हवा. संजय बोहरे, मिल्कीराम पटले, नापोशी संतोष शेंडे,राजेंद्र बिसेन, मंगेश काहालकर, संतोष बोपचे ,चालक दीपक बतबर्वे यांनी केली.
