News34 chandrapur
चंद्रपूर : मागील एप्रिल, मे महिन्यापासून चंद्रपूर शहर महानगरपालिकेवर प्रशासक राज सुरू आहे. तेव्हापासून मोठ्या प्रमाणात चंद्रपूर शहरातील कामे खोळंबली आहेत. Chandrapur breaking news
अमृत पाणीपुरवठा योजना आणि इतर समस्या देखील मार्गी लागलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी खासदार बाळू धानोरकर यांनी जनता दरबाराचे आयोजन करणार असल्याचे सांगितले आहे. Chandrapur municipal corporation त्यासाठी त्यांनी नागरिकांकडून सूचना आणि तक्रारी मागविल्या. त्यानंतर खळबळून जागे झालेल्या महानगरपालिकेने हेल्पलाइन सुविधा सुरू करून तक्रार निवारण करण्यासाठी नवीन ऍप नागरिकांपर्यंत पोहोचविन्याच्या खटाटोप सुरू केला आहे.

Janata darbar
चंद्रपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी आणि समस्या आहेत. त्या संकलित करण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी नागरिकांना 27 नोव्हेंबर पर्यंत सूचना आणि तक्रारी पाठवण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार मोठ्या प्रमाणात तक्रारींचा पाऊस खासदारांच्या कार्यालयात पडू लागला. Helpline number
ही बाब लक्षात येताच चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हेल्पलाइन नंबर सुरू केला आहे. खासदारांकडे थेट तक्रारी केल्यास महानगरपालिकेची नाचक्की होऊ शकते आणि खासदारांकडून सरबत्ती होण्याची भीती लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या आयुक्तांनी समस्या निवारण केंद्र देखील सुरू करून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. chandrapur politics
विशेष म्हणजे खासदार बाळू धानोरकर यांना चंद्रपूर महानगरातील समस्या जाणून घेण्यासाठी तब्बल 3 वर्षे लोटल्यावर जनता दरबार घेण्याची कल्पना सुचली.