News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्हा रुग्णालय आणि तेथील व्यवस्था चंद्रपूर मधील जनते करिता नवीन नाही आहे. आम आदमी पार्टी येथील व्यवस्थेच्या विरोधात सतत आवाज उचलत आलेली आहे. अशातच मूल तालुक्यातील श्रीमती मिराबाई दिनकर येवले या 60 वर्षीय महिला रुग्णाला चंद्रपूर जिल्हा रुग्णालय मध्ये दुपारी 12 वाजता भर्ती करण्यात आले होते. Aap
परंतु 24 तास उलटल्यानंतर सुद्धा एकाही डॉक्टरने त्यांच्याजवळ येऊन त्यांची साधी विचारपूस केली नाही, त्यांची तब्येत बघितली नाही. कोणतेही औषध उपचार त्यांच्यावर झाले नसल्याने त्यांचा अभावी मृत्यू झाला. याची माहिती मृतक मीराबाई येवले यांच्या मुलांनी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांना दिली. याबाबत जाब विचारण्याकरिता आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले याबाबत संबंधित हजर असलेले डॉक्टर यांना मृत्यूचे कारण विचारले असता सदर पेशंट हे बीपी मुळे मरण पावल्याचे सांगितले. आणि यांची तपासणी डॉक्टर सैनी यांनी केली असल्याचे सांगितले. Chandrapur medical college आपचे पदाधिकारी यांनी आपण डॉक्टर सैनि यांनी या पेशंटची तपासणी केली हे कशावरून म्हणता तर त्यांनी मृतकांच्या फाईलवर डॉक्टर सैनि यांची सिग्नेचर असल्याचे सांगितले परंतु मृतकाच्या बेडचा जवळील पेशंटच्या नातेवाईकांना विचारले असता सर्वांनी मागील 24 तासात एकही डॉक्टर या वार्डामध्ये फिरकला नाही, यानंतर जिल्हा रुग्णालयामधील डॉक्टर लोकांचा पेशंट वरती होत असलेली दुर्लक्षपना लक्षात घेऊन आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळ तेथील मेडिकल ऑफिसर जीवने यांच्याकडे संपूर्ण पेशंटचे नातेवाईकांना घेऊन त्यांच्या केबिनमध्ये गेले असता त्यांनी तिथून पळ काढला होता. यानंतर याची माहिती मेडिकल कॉलेजचे डीन यांना दिली आणि त्यांना जीवने यांना आपल्या केबिनमध्ये पाठवण्याची विनंती केली असता जीवने हे आमच्या सोबत मिटींगला आहे, तुम्ही इकडे येऊन तुमचे प्रश्न मांडू शकता असे म्हटल्यानंतर आम आदमी पार्टी चे पदाधिकारी डीन यांना भेटण्याकरिता गेले. Chandrapur health system आप च्या प्रश्नाचे उत्तरे डीन कडे नसल्याने आम्ही चौकशी करू त्यानंतर कारवाई करू असे म्हणत आप च्या पदाधिकाऱ्यांसमोर विषय डावलण्याचा प्रयत्न केला. यामुळे आपचे जिल्हाध्यक्ष यांनी जर तुम्हाला जिल्हा सामान्य रुग्णालय ची व्यवस्था सांभाळता येत नसेल तर तुम्ही आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा आम आदमी पार्टी त्या जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नाव बदलून जिला कत्तलखाना रुग्णालय असे ठेवू आणि तीव्र आंदोलन करू याचे सर्वस्वी जबाबदारी आपली राहणार असे त्यांना सुचवले. यावेळेला आपचे जिल्हाध्यक्ष सुनील देवराम मुसडे जिल्हा युवा अध्यक्ष मयूर राईकवार,शहर सचिव राजु शंकरराव कुडे, झोन संयोजक रहमान खान पठाण, युवा शहराध्यक्ष संतोष बोपचे, निखिल बारसागडे, अनुप तेलतुंबडे, अजय बातव, सुनिल सदभय्ये,सचिन खोब्रागडे, अश्रफ सय्यद ,जितेन्द्र कुमार भाटिया, श्रीनिवासन शेट्टी आदींची उपस्थिती होती.