News34 chandrapur
ब्रह्मपुरी - शिवसेना पक्षात बंड झाल्यानंतर शिवसेनेचे 2 गटात विभाजन झाले, शिंदे गटाची बाळासाहेबांची शिवसेना व शिवसेना उद्धव ठाकरे गट, हे दोन्ही गट राज्यात वर्चस्व कुणाचं हे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
दुसरीकडे ठाकरे गटातील असंख्य शिवसैनिक शिंदे गटात प्रवेश करीत आहे. Shivsena rebal
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील शिवसेना तालुका प्रमुखा सहित सर्व पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे सामूहिक राजीनामा पाठविला आहे. Uddhav thackeray
मागील वर्षी शिवसेना तालुका प्रमुख पदी नरेंद्र नरड यांची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र शिवसेना सत्तेत असताना सुद्धा कार्यकर्त्यांच्या समस्या सोडविण्यात कुणीही मदत करायला तयार नव्हते, संघटन वाढीसाठी आम्ही नेहमी प्रयत्न केले मात्र वरिष्ठ पदाधिकारी यांनी आमच्याकडे नेहमी दुर्लक्ष केले यासाठी आम्ही आपल्या पदाचा सामूहिक राजीनामा देत आहो असे नरड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ब्रह्मपुरी तालुक्यातील पदाधिकारी यांनी पक्ष संघटन वाढीसाठी कधीच प्रयत्न केले नाही, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी यांना प्रतिज्ञापत्र मागितले असता 15 हजार पैकी फक्त 700 प्रतिज्ञापत्र दिले. त्यांनी खरच पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले असतील तर इतक्या वर्षात काय काम केले त्याचा आधी आढावा द्यायला हवा होता.
पक्षाचं पद घेतल्यावर काम काही केले नाही, आता ब्रह्मपुरी तालुक्यात आता जुने व निष्ठावंत शिवसैनिक व नव्या युवकांना पक्षात संधी देण्यात येणार आहे. लवकरात लवकर नवे पदाधिकारी नेमण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी दिली.