News34 chandrapur
चंद्रपूर - शहरातील रामनगर पोलीस स्टेशन चौक ते MEL पर्यंत असणाऱ्या मार्गावर मागील काही दिवसापासून अंधार पसरला आहे. Shivsena chandrapur
चंद्रपूर महानगर पालिका, महाराष्ट्र वीज वितरण मंडळ आणि सार्वजनिक बांधकाम यांच्या ढिसाळ नियोजनामुळे मागील ३ महिने रामनगर पोलिस स्टेशन ते MEL पर्यंत स्ट्रीट लाईट बंद आहे.
या भोंगळ कारभारामुळे मागील दिवसात ३ लोकांचा अपघात होऊन मृत्यू पावलेले आहे आणि असेच अपघात भविष्यात पण होईल हि बाब लक्षात घेऊन, संदीप गिऱ्हे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनात तथा युवासेना जिल्हा समन्वयक विक्रांत सहारे, रिझवान पठाण, शहबाज शेख, शिवा वझरकर यांच्या मार्फत चंद्रपूर महानगर पालिका आयुक्तांना निवेदन सादर करून येत्या ७ दिवसात या समस्येचे निराकरण करावे ही विनंती केली.