News34 chandrapur
राजुरा - राजुरा तालुक्यात काही महिन्यांपूर्वी रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाला होता, त्या घटनेनंतर पुन्हा रेल्वेच्या धडकेत वाघाचा बळी गेला. Tadoba tiger
( South Central Railway)
दक्षिण मध्य रेल्वेच्या दिल्ली ते चेन्नई रेल्वे मार्गावर राजुरा पासून आठ किलोमीटर अंतरावर चनाखा गावाशेजारी रेल्वेने धडक दिल्याने एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना रात्री घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. माहिती मिळताच उप वनसंरक्षक श्वेता बोड्डू, उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांनी भेट दिली. Tiger dies in train collision
राजुरा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय अंतर्गत येणाऱ्या चुनाळा वनक्षेत्र परिसरातून रेल्वे लाईन गेली आहे. आज सकाळी रेल्वे गँगमन गस्त घालीत असताना त्याला रेल्वे रुळाशेजारी वाघ मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले. त्यांनी रेल्वे च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. रेल्वे विभागाने राजुरा वन विभागाला माहिती दिली. यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड आणि क्षेत्र सहायक प्रकाश मत्ते यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. ही वाघीण असून अंदाजे चार ते साडे चार वर्षाची असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.