News34 chandrapur (रमेश निषाद)
राजुरा - वर्ष 2012 पासून राज्यात सुगंधित तंबाखू व गुटख्यावर प्रतिबंध लावण्यात आला होता, जीवघेण्या कॅन्सर आजार पसरविणाऱ्या या वस्तूची आजही छुप्या पध्दतीने तस्करी होत आहे, यावर आळा घालण्यासाठी प्रशासन कमी पडले आहे. Cancer
ऐन दिवाळी सणाचा फायदा घेत एकाने शक्कल लढवीत लाखोंचा माल चंद्रपूर जिल्ह्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांसमोर तो प्रयत्न फसला. Tobacco smuggling
25 ऑक्टोम्बरला राजुरा पोलिसांना जिल्ह्यात सुगंधित तंबाखू येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती, माहितीच्या आधारावर पोलिसांनी नाकेबंदी केली. Chandrapur police
मौजा वाकडी वरून राजुरा कडे पांढऱ्या रंगाचे Tata Sumo gold हे चारचाकी वाहन क्रमांक Mh34 Am3024 येताना दिसले, पोलिसांनी वाहन थांबवित झाडाझडती घेतली असता त्या वाहनात सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला.
वाहनचालक 25 वर्षीय युवराज उर्फ आकाश चंद्रभान तिवारी रा. कोठारी याला ताब्यात घेतले.
मुद्देमाल काय मिळाला?
1) ईगल हुक्का शिशा तंबाखू असे लिहीलेले प्रत्येकी 200 ग्रॅमचे सिलबंद 92 नग पाउच प्रत्येकी 340 रू प्रमाने एकूण किंमत 31280 /- रू
2) मजा 108 हुक्का - शिशा तंबाखू असे लिहीलेले प्रत्येकी 50 ग्रॅमचे सिलबंद 398 नग डब्बे, प्रत्येकी 235 रू.प्रमाणे एकूण कि 93,530/- रु
3) मजा 108 हुक्का - शिशा तंबाखु असे लिहीलेले प्रत्येकी 200 ग्रॅमचे सिलबद 476 नग डब्बे प्रत्येकी 235 /- रू प्रमाण एकूण कि 4,45,060 /- रु.
4) विमल पान मसाला असे नाव असलेले 104 सिलबंद पाउच प्रत्येकी 120 रू प्रमाणे एकूण कि. 12480/- रु.
5) सिगनेचर फिटनेस पान मसाला असे नाव असलेले 75 सिलबंद पुडी प्रत्येकी 320 रू नग प्रमाणे कि. 24000/- रु
Vimal pan masala
6) प्रतिबंधीत सुगंधित तंबाखू वाहतुकी करीता वापरलेले एक पांढऱ्या रंगाची सुमो गोल्ड क्र एम एच 34 ए एम 3024 कि अ 4,00000/- रु.
7) इसम नामे युवराज उर्फ आकाष चंद्रभान तिवारी यांचे ताब्यातील एक विवो 21 प्रो कपनीचा मोबाईल कि -10,000/- रु असा एकूण कि.10,16350/- रू चा माल मिळून आल्याने सदरचा मुद्देमाल पंचासमक्ष घटनास्थळ जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करून ताब्यात घेण्यात आला. Chandrapur crime news
कारवाईची पुढील माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आली आहे, सदरची यशस्वी कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी पवार नेतृत्वाखाली ठाणेदार सपोनी दरेकर यांचे मार्गदर्शनाखाली पो उपनि राठोड, Asi टेकाम, रवींद्र नक्कनवार, किशोर तुमराम, महेश यांनी केली आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळत चंद्रपूर जिल्ह्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची तस्करी करीत कॅन्सर पसरविणाऱ्या या यमराजांवर आळा कोण घालणार?