News34 chandrapur
माजरी - 2 दिवसांपूर्वी माजरी येथील मानवी वस्तीत वाघाने शिरकाव करीत दिपू महतो याला फरफटत नेत ठार केले, त्यांनतर वनविभाग व प्रशासन जागे झाले. Tiger attack
सदर वाघ हा काही महिन्यांपासून त्या भागात अनेक नागरिकांना दिसला मात्र यावर वनविभागाने काही पाऊल उचलले नाही.
त्यानंतर वाघाने एकाला ठार केले असता प्रशासन खडबडून जागे झाले.
वाघाला पकडण्यासाठी माजरी परिसरात पिंजरे लावण्यात आले असून वनविभागाचे 2 अधिकारी सह 50 कर्मचारी व माजरी पोलीस स्टेशनचे तब्बल 20 कर्मचारी रोज परिसरात पेट्रोलिंग करीत आहे.
वनविभाग व पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे, सर्वांनी सावधान रहावं, रात्रीच्या सुमारास जंगल व सुनसान जागेवर पायदळ जाऊ नका, कसल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका असे आवाहन माजरी पोलिसांतर्फे केले आहे.