News34 chandrapur
गोंडपीपरी - रानडुक्करांचा कळप अचानक समोर आल्यानं बैलबंडीसह शेतकऱ्याचा शेत तळ्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गोंडपीपरी तालुक्यातील धानापूर येथे 16 ऑक्टोबर रोजी घडली होती.
त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांनी भेट दिली. या घटनेची संपूर्ण माहिती घेत या घटनेला वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.त्यामुळं संबंधित वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करून मृतकाच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भूषण फुसे यांनी केली आहे.
गोंडपीपरी तालुक्यातील धानापूर येथील शेतकरी भास्कर साळवे हे 16 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास आपल्या शेतातून बैलबंडी घेऊन घराकडे निघाले होते. अशातच त्यांच्या बैलबंडी समोर रानटी डुकरांचा wild boar मोठा कळप आल्यानं त्यांची बैलबंडी थेट शेत तळ्यात कोसळली.यात एक गाय व बैलासह भास्कर साळवे यांचा देखील मृत्यू झाला.या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगली जनावरांचा वावर असून वनविभागाचे याकडे दुर्लक्ष आहे.त्यामुळं एका निष्पाप शेतकऱ्याचा यात नाहक बळी गेला.
त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाला स्थानिक वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार असून दोषींवर कारवाई करावी व पीडित कुटुंबियांना आर्थिक नुकसान भरपाई देऊन वन्यप्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी वंचितचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांनी दिला आहे.यावेळी तालुका अध्यक्ष प्रकाश तोहोगावकर, महासचिव संदेश निमगडे,राजेश डोडीवार,धानापूर येथील संतोष पिंपळकर, प्रमोद वडस्कर,विलास पिंपळकर,संजय वडस्कर, प्रवीण भगत आदींची उपस्थिती होती.