News34 chandrapur
चंद्रपूर - राज्याच्या राजकारणात शिवसेनेत 40 आमदारांच्या बंडाने संपूर्ण शिवसेना पक्ष विस्कळीत केला. Political news
त्यानंतर स्वतः बंडखोर एकनाथ शिंदे यांनी भाजप पक्षासोबत हातमिळवणी करीत स्वतः मुख्यमंत्री पदी विराजमान झाले, आम्ही खरे शिवसैनिक, शिवसेना आमचीच, असा नारा ते देऊ लागले. Udhav balasaheb thackeray
मुंबई येथील अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीचा बिगुल वाजला, निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठविले.
सेनेचे 2 गट व नवे नाव उदयास आले, शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व शिंदे गटाची बाळासाहेबांची शिवसेना उदयास आली. Mashal
ठाकरे गटाला निवडणूक चिन्ह म्हणून मशाल मिळाली तर शिंदे गट अजूनही चिन्हासाठी धावपळ करीत आहे. Shivsena chandrapur
या सर्व घडामोडीवर चंद्रपूर शिवसेना काय म्हणते यावर News34 ने जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे.
संदीप गिर्हे ठाकरे गटाचे कट्टर कार्यकर्ते असून त्यांनी शेवटच्या कार्यकर्त्या पासून तर जिल्हाप्रमुख पदापर्यंत प्रवास केला, अनेक अडचणींचा सामना करीत ते पक्षाला सोबत घेत ठाकरे गटासोबत खंबीरपणे उभे आहेत. Thackeray group
संदीप गिर्हे यांनी सांगितले की, मशाल हे चिन्ह ठाकरे गटाला मिळाल्यावर चंद्रपुरात उत्साहाचे वातावरण तयार झाले असून आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून येणाऱ्या निवडणुकीत विजयाची धगधगती मशाल पेटविणार, आज बंडखोरांनी महाशक्ती समोर झुकून जो विश्वासघात केला ते जनता कधी विसरणार नाही. Andheri east election
अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मतदार पसंती देणार, शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गट म्हणजे आम्ही सर्व बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार व खरे शिवसैनिक आहो.
शिवसेना कधी संपणार नाही, आम्ही मशालीच्या माध्यमातून शिवसेना पक्षाला नवी उजाळी देण्यासाठी नेहमीच तत्पर राहू. उद्धव ठाकरे यांनी क्रांतीची मशाल पेटवली आहे, त्या मशालीची अग्नी आम्ही निवडणुकीत विजयाने धगधगत ठेवू.