News34 chandrapur
चंद्रपूर - राजुरा तालुक्यातील अहेरी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने फोडाफोडीचे राजकारण करीत जनतेमध्ये संभ्रम निर्माण केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून लावला आहे.
वंचित बहुजन आघाडी व भाजपमध्ये कसल्याही प्रकारची अधिकृत बोलणी व युती झाली नाही मात्र निवडणूक प्रचाराच्या फलकावर वंचित व भाजप नेत्यांचे फोटो लावत जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
भाजपने वंचित च्या स्थानिक कार्यकर्त्यांना हाताशी घेत पैशाचे आमिष दाखवून फोडाफोडीचे राजकारण सुरू केले. Politics news
जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व माजी आमदार संजय धोटे यांच्या सांगण्यावरून हे सर्व कृत्य करण्यात आले असल्याचा आरोप फुसे यांनी लावला आहे.
इतकेच नव्हे तर प्रचाराच्या फलकावर गोंडवाना गणतंत्र पार्टीचे नेते गोदरू पाटील जुमनाके यांचाही फोटो लावण्यात आला आहे.
या फलकाने जनतेमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे, याबाबत भूषण फुसे यांनी निवडणूक अधिकाऱ्याला तक्रार सुद्धा दिली आहे.
भाजपच्या या प्रकाराने वंचित बहुजन आघाडीची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न केला जात आहे, कारण ग्रामीण भागात भाजप ला वगळून ग्रामीण जनता वंचित बहुजन आघाडीला जास्त पसंती देत आहे.
भाजपच्या या कृत्याचे उत्तर जनता मतदानाच्या माध्यमातून करणार आहे.