News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मूल - : तालुक्यातील चीरोली येथे शेतात धानपिकाला पाणी टाकायला गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना (११ ऑक्टोंबर) सकाळी ८.०० वाजताच्या दरम्यान घडली. Tiger attack
येवनाथ विकरुजी चूनारकर (७५ वर्षे) रा. चीरोली असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना चीरोली नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक ७२० मध्ये घडली. नेहमीप्रमाणे शेतात धान पिकाला पाणी करण्यासाठी सकाळी शेतात गेले असता दबा धरून असलेल्या वाघाने अचानक हल्ला करून ठार केले. घटनेची माहिती मिळताच चीचपल्ली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे, क्षेत्र सहायक मस्के, खनके, पडवे, घागरघुण्डे, वनरक्षक राकेश गुरनुले,मरसकोले, रोघे, मानकर,कु शीतल व्यहाडकर व पोलीस कर्मचारी उपस्थित होऊन घटनेचा पंचनामा केला व वनविभाग मार्फत वन परिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे यांनी मृत्काच्या कुटुंबियांना तात्काळ ३० हजाराची आर्थिक मदत देऊन मृतदेह उत्तरीय तपासणी करीता मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.