News34 chandrapur
चंद्रपूर - शहरातील अल्पवयीन मुले काही ठिकाणी E-सिगारेट च्या आहारी गेल्याचे अनेकांना निदर्शनास आले, शहरात अनेक दिवसांपासून प्रतिबंधित E-सिगारेट ची मोठ्या प्रमाणात तस्करी व त्याचा वापर सुरू होता.
Crime news
Crime news
रामनगर पोलीस स्टेशनचे पोउपनी विनोद भुरले यांना उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांनी याबाबत माहिती दिली.
माहितीच्या आधारे रामनगर पोलीस स्टेशनमधील गुन्हे अन्वेषण विभागाचे सपोनि हर्षल एकरे यांनी आपल्या चमुसह रामनगर चौकातील निशा प्रॉव्हिजन व टेक्स स्मोकिंग शॉप येथे झडती घेतली असता पोलिसांना मोठ्या प्रमाणात yuota thanos puffes, elebar bc puffes, caliburn keep on kiping koko, lite 40 या E-सिगारेट चा साठा पोलिसांनी जप्त केला.
कारवाई नंतर सपोनि हर्षल एकरे यांनी शहरातील नागरिकांना आवाहन केले की सध्या या सिगारेटचा वापर अल्पवयीन मुले मोठ्या प्रमाणात करीत आहे. Ban e-cigarette
याबाबत आपण आपल्या मुलांवर लक्ष ठेवा, e-सिगारेट बाबत आपल्याला काहीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.
रामनगर पोलिसांनी तब्बल 39 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
E-सिगारेट म्हणजे काय?
जिचा सिगारेटसारखा धूर होत नाही, अशी सिगारेट म्हणजे ‘ई- सिगारेट’ किंवा ‘इलेक्ट्रॉनिक सिगरेट’. तंबाखूजन्य सिगरेट न ओढता तंबाखूमध्ये असलेलं निकोटिन हे द्रव्य शरीरात घेण्याचा एक मार्ग म्हणून ही सिगारेट वापरली जाते. ई-सिगारेट दिसतेही साध्या सिगारेटसारखीच. फरक असा, की ई-सिगारेटमध्ये तंबाखू नव्हे, तर थेट द्रवरूपातलं निकोटिन असतं. ही सिगारेट पेटवण्यासाठी लाईटर किंवा काडेपेटी लागत नाही, कारण या सिगारेटच्या उपकरणात एका लहानशा बॅटरीचा समावेश असतो.
जेव्हा सिगारेट ओढण्याची कृती केली जाते तेव्हा या सिगारेटमधील द्रवरूप निकोटिनची वाफ तयार होऊन ती ओढली जाते. या वाफेला प्रत्यक्ष धूम्रपान केल्यासारखा वास नसतो. सिगारेट प्रत्यक्ष पेटवली जात नसल्यामुळे त्यापासून राखही तयार होत नाही.
E-सिगारेट धूम्रपान म्हणजे काय?
द्रव्यरूपातील निकोटिनची विद्युत उपकरणाच्या माध्यमातून वाफ बनवली जाते आणि याचा धूम्रपानासाठी वापर केला जातो याला ई धूम्रपान असे म्हटले जाते. यामध्ये ई सिगारेट, फ्लेवर हुक्का, ई शिशा इत्यादी निकोटिनयुक्त उपकरणांचा समावेश आहे.
E धुम्रपाणाचे शरीरावर होणारे परिणाम
निकोटिनयुक्त विद्युत उपकरणांमध्ये निकोटिनपासून वाफ निघत असल्याने याला व्हेपिंग म्हटले जाते. ई सिगारेटमध्ये ई ज्यूस असून यात प्रोपेलीन ग्लायकॉल, व्हेजिटेबल ग्लिसरीन आणि निकोटिन यांचे मिश्रण असते. निकोटिन कितीही प्रमाणात शरीरात घेतले तरी त्याचे दुष्परिणाम नक्कीच आहेत. कमी प्रमाणात घेतले तरी मळमळणे, पोटात दुखणे, डोळ्याला जळजळ होणे असे धोके असतात, तर अतिप्रमाणात घेतल्यानंतर रक्तदाब वाढणे, हृदयाचे ठोके वाढणे, काही जणांना आकडी येण्यासारखेही त्रास होण्याची शक्यता असते.
ई सिगारेट आणि सिगारेटचे प्रत्यक्ष माणसांवर केलेल्या अभ्यासांची संख्या मोजकीच असली तरी प्राणी किंवा अन्य घटकांवर केलेल्या अभ्यासातून ई सिगारेटमधील ई ज्यूसमुळे श्वसनयंत्रणा पोखरत जाते. भविष्यात सीओपीडी, ब्रॉन्कायटिस यांसारखे श्वसनाचे आजार जडण्याची शक्यता असते. ई सिगारेटचे फुफ्फुस, हृदय, मूत्रपिंड आणि यकृतावर गंभीर परिणाम होतात, तसेच यामुळे डीएनएसुद्धा बाधित होतात. श्वसननलिकेवरील आवरणावर परिणाम होऊन विविध घातक घटकांपासून संरक्षण करण्याची क्षमता कमी होते.
अशा रुग्णांमध्ये न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. फुफ्फुसांचे कार्य बिघडते. तसेच निकोटिनसह ई सिगारेटमध्ये असलेल्या अन्य घटकांमुळे कर्करोग होण्याचीही शक्यता असते.