News34 chandrapur
चंद्रपूर - : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूरतर्फे मंगळवार, दि. 18 ऑक्टोबर, 2022 रोजी सकाळी 11 वाजता ज्युबली हायस्कुल, चंद्रपूर येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र स्टार्ट अप, रोजगार व उद्योजकता सप्ताहानिमीत्त या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून जिल्हातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने,राज्यांतील नामांकित उद्योजकांचा थेट नोकरीस इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्या दृष्टीने, सदर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. Job placemant
या रोजगार मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या सहभागी होत असून या माध्यमातून विविध नामांकित कंपन्यामार्फत 2 हजारपेक्षा जास्त पदे भरण्यात येणार आहे. या मेळाव्यातून उमेदवारांना नागपूर, चंद्रपूर, कोल्हापूर औरंगाबाद, पूणे व अमरावती या जिल्ह्याच्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. या कंपन्यामध्ये विविध पदे असल्याचे उद्योजकांकडुन कळविण्यात आले आहे. Job search
मेळाव्याकरीता उमेदवारांनी आधारकार्ड, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे छायाकिंत कमीत-कमी तीन प्रतींसह उपस्थित राहावे. मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरीता https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करावी व ऑनलाइन अप्लाय करावे. तसेच या मेळाव्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांविषयी जिल्हा समन्वयक अमरीन पठाण या मार्गदर्शन करणार आहेत. सदर रोजगार मेळाव्यात कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. रोजगार मेळाव्याच्या अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या 07172 252295 कार्यालयीन दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.
