News34 chandrapur
बल्लारपूर - पती पासून विभक्त राहणाऱ्या एका महिलेस नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन मध्यप्रदेश राज्यात विक्री केल्याप्रकरणी राजुरा येथील एका महिलेसह इतर दोन व्यक्तींना बल्लारपूर पोलिसांनी अटक केली आहे. Human trafficking
रमाबाई वार्ड राजुरा येथील रहिवासी आशाबाई कवडू रामटेके उर्फ माधुरी माणिकराव वाघमारे हिने आपल्या जुन्या संबंधातून ओळख झालेल्या पीडित महिलेला नागपूर येथे नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून पतीपासून विभक्त राहणाऱ्या एका महिलेची मध्यप्रदेशातील उज्जैन येथे विक्री केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. Chandrapur crime news
पीडित महिलेचे तिच्या पतीसोबत पटत नसल्याने ती बल्लारपूर येथे एक महिन्यापूर्वी आपल्या नातेवाईकाकडे राहण्यास आली. तिथून काही दिवसांनी ती विसापूर येथील दुसऱ्या नातेवाईकाकडे गेली. दरम्यान तिच्या शेजारी राहणारी आशाबाई वाघमारे हिच्याशी ओळख झाली. तिने पीडितेला नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने बल्लारपूर येथे भेटायला बोलाविले व नागपूर येथे नोकरी लावून देते असे म्हणून नागपूरला चालण्यास सांगितले. परंतु, ती सदर महिलेस थेट उज्जैन येथे घेऊन गेली. तिथे प्रेम नावाच्या व्यक्तीने मदन अंबाराम राठी (40) कडून 1 लाख रुपये घेऊन पीडितेसोबत लग्न लावून दिले.
असा उघडकीस आला प्रकार
भावाने बल्लारपूर पोलिसांत केली तक्रार
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने संधी साधून राजुरा येथे राहणा-या मावशीला फोन करून घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली व उज्जैन येथील केसराबाई मंथन व तिचा मुलगा यांना लग्नासाठी म्हणून आपल्याला एक लाख रुपयाला विकले असुन त्यांनी आपल्याला घरात कोंडून ठेवल्याचे सांगितले. यावरून पीडतेचा भाऊ आकाश यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
मध्यप्रदेश गाठून पोलिसांनी केली महिलेची सुटका
पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमीज मुलानी आपल्या ताफा सोबत मध्य प्रदेशातील उज्जैन ता, महेतपूर गाठून सदर महिलेचे सुटका केली. तसेच आरोपी मदन अंबादास राठी, केसराबाई मंथन, आशाबाई कवडू रामटेके यांच्यावर कलम भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने चार दिवसाची पोलिस कोठडी दिली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शैलेंद्र ठाकरे करीत आहे.