News34 chandrapur
चंद्रपूर : महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त वितरीत केलेल्या काजू व बदाम सुकामेव्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची शंका निर्माण झाली आहे. कर्मचाऱ्यांना निकृष्ट दर्जाचा सुकामेवा वितरीत करुन पाकिटामध्ये निर्धारित वजनापेक्षा कमी सुकामेवा देण्यात आल्याचा आरोप जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केला असून भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. dried fruit diwali
चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्रात जवळपास तीन हजार कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त प्रत्येकी २५० ग्रॅम काजू व २५० ग्राम बादामचा डब्बा भेट देण्यात आला. चंद्रपूर मधील बिकानेर नावाच्या एजन्सीकडून या सुकामेव्याचा पुरवठा करण्यात आला आहे. वीज निर्मिती केंद्राकडून पुरवठादाराला प्रत्येक डब्यामागे ५०० रुपये देण्यात आले. मात्र या डब्यातील काजू व बदाम अतिशय नित्कृष्ट दर्जाचे आहेत. अनेक कर्मचाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर आता हे सर्व डबे परत मागविण्यात आल्याची माहिती वीज निर्मिती केंद्राच्या संबंधित अधिकाऱ्यांनी पप्पू देशमुख यांना दिली आहे. या सर्व गैरप्रकारावर पांघरून घालण्यासाठी विज निर्मिती केंद्राच्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना सुकामेव्याचे डबे परत करण्याचे निर्देश दिले आहे. काजू व बदाम नित्कृष्ट दर्जाचे असल्याने वीज निर्मिती केंद्रातील अधिकाऱ्यांनी डब्यातील काजू- बदामाची तपासणी का केली नाही, या प्रकरणात पुरवठादारासोबतच वीज निर्मिती केंद्रातील अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आहे. निकृष्ट दर्जाचा सुकामेवा पुरविणाऱ्या कंत्राटदाराचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे, तसेच या गैरप्रकारची चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पप्पू देशमुख यांनी केली आहे. Power Generation Center Chandrapur
अव्वाच्या-सव्वा दराने खरेदी
तीन हजार कर्मचाऱ्यांसाठी वीज निर्मिती केंद्राला जवळपास ७०० किलोग्रॅम काजू व ७०० किलोग्रॅम बदामची मागणी होती. घाऊक बाजारामध्ये जिएसटीसह काजूची किंमत ७०० रुपये तर बादामची किंमत ६५० रुपये प्रति किलोग्रॅमच्या जवळपास आहे. म्हणजे एक किलोग्रॅम काजू व बदामसाठी एकूण एक हजार १३५० रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र वीज निर्मिती केंद्राने एक किलोग्रॅम काजू व एक किलो बदामकरीता प्रत्येकी एक-एक हजार रुपये असे एकूण दोन हजार रुपये मोजले. म्हणजे दोन्ही मिळून प्रत्येक किलोग्राम मागे अंदाजे ६५० रुपये पुरवठादाराला जास्तीचे देण्यात आले.
पाकिटामागे १२ ग्रॅमचा काटा
पुरवठादराने प्रत्येक पाकिटामध्ये २५० ग्रॅम काजू व २५० ग्राम बदाम देणे आवश्यक होते. तसेच डब्यामध्ये प्रत्येक पाकिटात २५० ग्रॅम काजू व २५० ग्राम बदाम असल्याची शहानिशा संबंधित अधिकाऱ्यांनी करणे सुद्धा गरजेचे होते. मात्र पुरवठादाराने काजू व बदामच्या प्रत्येक पाकिटामागे १२ ग्राम वजन कमी दिल्यानंतर वीज निर्मिती केंद्राच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांनी पप्पू देशमुख यांचे आरोप फेटाळून लावले, आम्ही एकाही कर्मचाऱ्यांना निकृष्ट दर्जाचा सुकामेवा दिलेला नाही उलट आम्ही चांगल्या दर्जाचे म्हणजेच हल्दीराम कंपनीचा सुकामेवा दिला आहे, राहिला प्रश्न भ्रष्टाचाराचा आम्ही रास्त दरात सुकामेवा घेतलेला आहे.
जनविकास सेनेचे अध्यक्ष यांनी लावलेले सर्व आरोप खोटे आहे.