News34 chandrapur
भद्रावती - भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा गावातील विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेत धाडसी चोरीची घटना उघडकीस आली असून यामध्ये अज्ञात चोरट्यांनी तब्बल 21 लाख रुपयांचा मुद्देमाल पळविला. Bank robbery
Vidarbha konkan gramin bank robbery
भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील मुख्य मार्गावर विदर्भ कोंकण ग्रामीण बँक आहे, बँक बंद झाल्यावर अज्ञात आरोपीनी मागील बाजूस असलेली खिडकी तोडून बँकेत प्रवेश केला.बँकेच्या आत शिरल्यावर अज्ञात आरोपी काही वेळ बँकेत होती, अज्ञात चोरांनी एक-एक करीत लाखो रुपये किमतीच्या सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम सह एकूण 21 लाखांच्या मुद्देमलावर अज्ञात चोरांनी हात साफ केला. Bank robbery
ग्रामस्थांना सकाळच्या वेळी बैंकेचे खिडकी तुटून दिसल्याने त्यांचा संशय बळावला व त्यांची या घटनेची माहिती तातडीने बैंकेचे व्यवस्थापक सद्दाम फुलझेले यांना दिली. यानंतर भद्रावती पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपानी पोलिस पथकासह श्वान पथक घेवून घटनास्थळाची पाहणी केली. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस घटनास्थळी तपास करीत होते.