News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मूल - गुरे चराईसाठी नेलेल्या दोन गुराख्यांना जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने ठार केल्याची घटना चिचपल्ली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या कवळपेठ येथे बुधवार दिनांक १९/१०/२०२२ रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान घडली. या हल्यात येथील ढिवरु वासेकर वय (55) वर्षे व नानाजी निकेसर वय (53) वर्षे रा. चिंचाळा असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या गुराख्यांचे नांव आहे. Tiger hunt
Tiger attack
Tiger attack
मूल हा संपूर्ण धान पट्टा आहे, आणि या परिसरातील जंगलव्याप्त भाग असल्यामुळे शेतकरी मोठया प्रमाणावर गुरांना चराईसाठी नेहमीच नेतात. गुराख्याने रोजच्या प्रमाणे आज बुधवारी चिचाळा येथील धिवरू वासेकर वय 55 वर्षे आणि नानाजी निकेसर वय 53 वर्षे हे गुरांना घेवुन कवळपेठ परिसरात चराई नेले होते, दरम्यान लागूनच असलेल्या जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने दोन्ही गुराख्यावर हल्ला करून ठार केले. घटनेची माहीती गावकऱ्यांना होताच गावकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असता चीचपल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे यांच्या मार्गदरशनाखाली तात्काळ आपल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळावर पोहचले सोबत वनविभागाचे क्षेत्र सहायक मस्के, वनरक्षक मर्सकोल्हे, बीट वनरक्षक चौधरी, रोगे, व पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले आहे. Man eater tiger
यासंदर्भात चीचाला येथील ग्राम पंचायत सदस्य तथा मुल तालुका शिवसेना अध्यक्ष प्रशांत गट्टूवार यांनी घडलेल्या घटनेची दखल घेऊन वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा व वाघाच्या हल्यात ठार झालेल्या मृतकांच्या कुटुंबीयांना वन विभागाने सर्वतोपरी मदत द्यावी अशी मागणी केली असून दोन्ही मृतदेह शव विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले असून मृतकाच्या कुटुंबीयांना वन विभागाकडून वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे यांच्या हस्ते तात्काळ प्रत्येकी तीस हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली.
