News34 chandrapur (रमेश निषाद)
बल्लारपूर - दिनांक 19/10/2022 रोजी शहर संयोजक रविकुमार पुप्पलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव ज्योतिताई बाबरे यांच्या नेतृत्वात बल्लारपूर शहरात सौदर्यीकरणाच्या नावाखाली राज्यसरकारच्या विशेष निधीतून 36 लाख 76 हजार चे मोरपंख, एकूण 200 मोरपंख वस्ती ते नगरपरिषद, पेपरमिल काटा गेट ते नगरपरिषद, FDCM ते नगरपरिषद लावण्यात आले होते.
200 मधून काही मेन्टेन्स साठी ठेवण्यात आले परंतु आम आदमी पक्षाने हा मुद्दा उचलला तोच आठ ते दहा वेळा कंत्राटदाराकडून सुधारण्यात आले पुन्हा लावण्यात आले, नगरपरिषद मधील संबंधित अधिकाऱ्याकडून माहिती घेतल्यास त्यांनी सांगितले की मेंटेन करण्याचा खर्च खूप वाढत चालल्यामुळे आता ते मोरपंख बंद आहेत व मेन रोडवरील काढून टाकण्यात आले आहे, या सर्व माहितीतुन व लोकांशी संवाद केल्यानंतर असे दिसून आले की हा मोरपंख वर झालेला खर्च व्यर्थ आहे.
