News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मूल/दिल्ली - भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी झालेल्या पक्षीय निवडणुकीत आज झालेल्या मतमोजणी नुसार काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष म्हणून मान.श्री.मल्लिकार्जुन खरगे यांनी बहुमताने वीजयी झाल्याने महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्याच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने नवनियुक्त अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले. Mallikarjun kharge
Congress president election अभिनंदन करतांना महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री व ब्रह्मपुरी क्षेत्राचे आमदार श्री. विजय वडेट्टीवार , राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, बँकेचे संचालक संदीप गड्डमवार, संचालक डॉ.विजय देवतळे, चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, नागभिड येथील प्रफुल खापर्डे, चीमुरचे गजानन बुटके आदी काँग्रेस पदाधिकार्यांनी मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्यात. News congress president