News34 chandrapur
गोंडपीपरी - गोंडपीपरी वरून मूल कडे जाणाऱ्या मार्गावर कारचालकाचे ब्रेक फेल झाल्यावर ऑटोला धडक दिली, या धडकेत दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून 1 इसम जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. Road accident
गोंडपीपरी वरून मूल मार्गावर निघालेल्या कारचे अचानक ब्रेक फेल झाले, त्याचवेळी अचानक वढोलीवरून गोंडपीपरी कडे येणाऱ्या ऑटोला कार चालकाने जोरदार धडक दिली.
या अपघातात 1 जखमी झाला असल्याची माहिती मिळाली आहे, मागील काही दिवसांपासून गोंडपीपरी येथे अपघाताच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
गोंडपिपरी धाबा मार्गाची खस्ता हालत, गोंडपिपरी मुल मार्गावर टाकलेली चुरी व सुरजागड लोहप्रकल्पाच्या वाहनामुळ वाढलेली अनियंत्रीत वाहतूक अपघातात कारणीभूत ठरत आहे.