News34 chandrapur
चंद्रपूर - महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रात सर्वात मोठी जवळपास १२ हजार ५०० पदांची पोलिस शिपाई संवर्गातील भरती जाहीर केली होती. परंतु आज ED सरकारने प्रशासकीय कारण देत पोलिस भरती स्थगित केली आहे असे आदेश काढले.
राज्यातील रोज़गाराचा प्रश्न बिकट असताना एकीकडे महाराष्ट्रातले वेदांता फॉक्सकॉन, टाटा एयरबस यासारखी मोठी गुंतवणूक असलेले उद्योगधंदे एका पाठोपाठ गुजरातला आंदण देऊन राज्यातील तरुणांच्या हक्काचा रोजगार हिरावून घेत आहेत. Police bharti 2022
हे खोके सरकार सत्तेत आल्यापासून एक एक प्रकल्प राज्याच्या बाहेर जाऊन राहलेत. या सरकार तर्फ़े यूवकांना फ़क्त स्वप्नांचे गाजर दिल्या जात आहे. Shinde-fadanvis
राज्यातील तरुणांवर अन्याय होत असताना महाराष्ट्रातील तरुणांच्या हक्काची जी नोकरी वेळेत द्यायला पाहीजे होती ती नोकरी सुद्धा आज या ED सरकारने प्रशासकीय कारण देत पोलिस भरती स्थगित केली आहे असे आदेश काढले.
हि बाब राज्यातील युवकांसाठी अत्यंत दुर्दैवी असुन पोलिस भरतीला स्थगिती देनारया खोके सरकारच्या विरोधात चंद्रपूर शिवसेना-युवासेना आक्रमक झाली असुन शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप
गिऱ्हे यांच्या नेतृत्वात रामनगर चौक येथे ED सरकार च्या विरोधात आंदोलन करण्यात आले. Shivsena chandrapur
सदर आंदोलनात चंद्रपूर शहरप्रमुख सुरेशभाऊ पचारे, प्रजोत पुनेकर, गणेश ठाकुर बाळु भगत युवासेना ज़िल्हा समन्वयंक विक्रांत सहारे, युवासेना ज़िल्हा चिटणीस विनय धोबे, युवतीसेना उपज़िल्हा प्रमुख रोहिणीताई पाटील, शहर समन्वयंक करण वैरागडे, वैभव काळे, रिज़वान, सूजीत पेंदोर, सागर धनसकर, शिवा वझरकर, शाहबाद, काजल बुटले, संतुष्टी बुटले, तसेच अनेक कार्यकरते उपस्थित होते.