News34 chandrapur
मुंबई - राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार हे प्रकृतीच्या कारणास्तव ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झाले आहे, डॉक्टरांनी पवार यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता.
पुढील 3 दिवस पवार यांच्यावर उपचार होणार अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली आहे.
पक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ब्रीच कँडी रुग्णालयात पुढील तीन दिवस उपचार घेणार आहेत. २ नोव्हेंबरला त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. Ncp president sharad pawar
दरम्यान ३ नोव्हेंबरला शरद पवार शिर्डीला जाणार आहेत. पक्षाचं दोन दिवसांचं शिबीर होणार असून त्यासाठी ते उपस्थित राहून मार्गदर्शन करतील अशी माहिती पक्षाने दिली आहे.
पक्षाच्या वतीने रुग्णालय परिसरात कार्यकर्त्यांनी गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.