News34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही - अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर चंद्रपूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली, काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस आला.
सिंदेवाही तालुक्यातील आंबोली येथे गावाजवळ गाय चारा खात असताना अचानक वीज कोसळली.
गाईच्या अंगावर वीज कोसळल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, युवराज बोईनवार यांच्या मालकीची ती गाय होती. lightning
वीज कोसळल्याची माहिती मिळताच तलाठी व मंडळ अधिकारी चिडे यांनी मोका स्थळी जाऊन पंचनामा केला. Heavy rains