News34 chandrapur
मूल (गुरू गुरनुले) मालधक्का हटवा शहर वाचवा यासाठी वेगवेगळया संघटना आणि लोकप्रतिनिधी प्रयत्नशील असतांना काही मंडळींनी मात्र रोजगारासाठी मालधक्का झालाच पाहिजे असा हेका प्रशासनासमोर धरला असून व्हॉटस्अॅप ग्रुपवरही वेगवेगळी मत नोंदवत प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. त्यामूळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला रेल्वे मालधक्का होणार की, रद्द होणार अशी चर्चा नगरात केली जात आहे.
Iron ore mine
गडचिरोली जिल्हयातील सुरजागड येथील लोहखनीज उत्खननाशी संबंधीत असलेला मालधक्का शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या निसर्गरम्य परिसरात झाल्यास शहरवासीयांना अनेक बाबतीत त्रास होणार. संभाव्य त्रास लक्षात घेवून विविध संघटनांनी मालधक्का हटवा शहर वाचवा असा नारा देत मालधक्का निर्मितीचे काम बंद पाडले. परंतू तात्पुरते बंद झालेले काम भविष्यात केव्हाही सुरू होवू शकते, ही शक्यता लक्षात घेवून मालधक्का निर्माण करणाऱ्या विभागाचे लक्ष वेधण्यासाठी विविध संघटनाच्या वतीने वेगवेगळया मार्गाचा अवलंब करण्यांत आला. जिल्हयातील आजी व माजी लोकप्रतिनिधींना भेटून शहरा लगत मालधक्का नसावा, अशी मागणी केली, त्यावेळेस जनभावनेचा विचार करून लोकप्रतिनिधींनीही नेतृत्व करणाऱ्या संघटनांना मालधक्का शहरालगत होणार नाही, यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तरी सुध्दा रेल्वे प्रशासनातील वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून मालधक्का निर्मितीसाठी हालचाल सुरूच होती. अधिकाऱ्यांची ही हालचाल बंद व्हावी म्हणून मालधक्का हटवा शहर वाचवा आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या काही मंडळींनी क्षेत्राचे आमदार तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. यावेळी उपस्थित असलेल्या रेल्वे व वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष चर्चा झाल्यानंतर मूल शहरालगत होणारा मालधक्का इतरत्र स्थानांतरीत करावा, असे निर्देश सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे येथील रेल्वे मालधक्क्याला सध्यातरी लगाम लागल्याचे बोलल्या जात आहे. परंतू येथीलच हजाराच्या वर नागरीकांनी मूल येथे मालधक्का निर्माण झाल्यास औद्योगीक विकास महामंडळाच्या परिसरात पुन्हा नवीन उद्योग येवुन बेरोजगार असलेल्या स्थानिक युवकांना रोजगाराची संधी मिळेल, त्यामूळे मूल येथे रेल्वे मालधक्का झालाच पाहिजे. अश्या आशयाचे निवेदन अनेकांच्या स्वाक्षरी सह जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक यांचे शिवाय पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले.
शहरातील विविध संघटना आणि बहुतांश नागरीकांकडून रेल्वे मालधक्क्याचा वेगवेगळया मार्गाने प्रचंड विरोध होत असतांना दुसरीकडे मात्र शहरातील काही नागरीक शहरालगत मालधक्का झालाच पाहिजे. म्हणून शहरातील हजाराच्या वर नागरीकांच्या सहयांचे निवेदन प्रशासनाकडे सुपूर्द केला आहे. दुसरी कडे विविध व्हॉटसअॅप ग्रुपवरही मालधक्याचा विषय चांगलाच रंगत आहे. प्रदुषणाच्या नांवाखाली जर मालधक्का नको असेल तर नागरी वस्तीलगत भात गिरण्यांही नको. अशी मागणी पुढे करता शहरालगत असलेल्या भात गिरण्यांमूळे ध्वनी आणि वायु प्रदुषण होत असल्याने नागरीकांच्या आरोग्याला धोका पोहोचत आहे, त्यामूळे मालधक्का हटाव सोबतचं नागरी वस्तीलगत असलेल्या भात गिरण्यांही शहराबाहेर हलवाव्या, असा हेका धरला आहे. मालधक्का हटवा शहर वाचवा मोहीम सुरू असतांना येथील काही जमीनदारांचाही विषय अनेकांनी चर्चीला आहे. रेल्वे स्टेशन लगत मालधक्का निर्माण झाल्यास आपल्या जमीनीला अपेक्षीत भाव मिळणार नाही, या भितीपोटी रेल्वे स्टेशन परिसरात पूर्वीच आर्थिक लाभासाठी खरेदी करून ठेवलेले जमीनदारही मालधक्क्याचा विरोध करीत सर्वात पुढे आले. असल्याचा आरोप मालधक्का झालाच पाहिजेचा आग्रह करणाऱ्या मंडळीं कडून केल्या जात आहे. एकंदरीत मालधक्क्याच्या विरोधात शहरात निर्माण झालेले प्रारंभीचे वातावरण वेगवेगळया चर्चेमूळे दुषीत होत असून पुर्वी झालेली मालधक्का हटाव संबंधीची एकी आता दुभंगुन गेल्याचे आणि केली जात असल्याच्या चर्चेवरून उघड उघड मतभेद होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामूळे सुधीरभाऊंच्या हस्तक्षेपाने स्थानांतरीत होणारा रेल्वे मालधक्का नागरीकांमधील दुफळी मूळे आता शहरालगत होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.