News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपुरातील राजकारणात खळबळ माजविणारी घटना उघडकीस आली असून शिवसेना पक्षाच्या महिला पदाधिकारी यांनी कोळसा व्यापारी अमित अनेजा यांना खंडणी साठी तगादा लावला. जर पैसे दिले नाही तर कोल ट्रान्सपोर्ट होऊ देणार नाही, पैसे देण्याची इच्छा नसल्याने अनेजा यांनी याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक व शिवसेना जिल्हाप्रमुख यांना ऑनलाइन मेल करीत तक्रार दिली. Extortion
घटना काय आहे?
चंद्रपूर ते घुघुस मार्गावर कोलडेपो अनेक वर्षांपासून सुरू आहे, त्यातच नागाडा गावात अमित अनेजा यांचा कोळशाचा व्यवसाय आहे, 2 दिवसांपूर्वी राजकीय पक्षाचे काही कार्यकर्ते अनेजा यांच्या कोलडेपो वर पोहचून गोंधळ घालू लागले, त्यावेळी उपस्थित असलेले कर्मचारी यांनी विचारणा केली असता त्यांनी सरळ धमकवीत तुम्ही अवैध काम करीत आहे, तुमच्या कोलडेपो मुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत असून तात्काळ प्रदूषण थांबवा अशी ताकीद देत पदाधिकाऱ्याने Visiting कार्ड देत तात्काळ भेटा असे सांगितले.
दुसऱ्या दिवशी अमित अनेजा राजकीय पदाधिकारी यांच्या कार्यालयात गेले मात्र त्यांनी अनेजा यांच्याशी उद्धट वागणूक देत, काम सुरू ठेवायचं असतील तर मदत करावी लागेल, अन्यथा तुमच्या कोलडेपो मधून एकही गाडी बाहेर जाऊ देणार नाही. Crime chandrapur
आम्ही शिवसैनिक आहोत, मदत करावीच लागेल अशी ताकीद कार्यकर्त्यांनी दिली, रात्री 8 वाजता अमित अनेजा यांना त्या पदाधिकाऱ्याने मोबाईलवर सम्पर्क साधत तात्काळ कोलडेपो वर या आम्ही धरना आंदोलन करणार आहो अशी धमकी दिली.
हा सर्व प्रकाराची चित्रफीत व ऑडिओ क्लिप अमित अनेजा यांच्याकडे आहे, याबाबत त्या महिला पदाधिकाऱ्यांशी सम्पर्क केला असता त्यांचा मोबाईल बंद होता.
शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली का हा सर्व प्रकार व माहिती पक्षातील वरिष्ठ नेत्यांना देण्यात आली असून याबाबत त्या पदाधिकाऱ्यावर कारवाई निश्चित होणार आहे.
पोलिसांना online mail द्वारे अमित अनेजा यांनी तक्रार दिली असून याकडे पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.