News34 chandrapur
चंद्रपूर - राजकीय पद मिळालं की मिळते एक नवी जबाबदारी, मात्र पक्षाशी प्रामाणिक व पदाचा अहंकार त्या पदाधिकाऱ्याला वेगळ्या वळणावर घेऊन जातो. Crime chandrapur
असंच चंद्रपूर जिल्ह्यातील एका राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याने पुढाऱ्यांना लाजवेल असा प्रताप केला आहे. Extortion
चंद्रपुरातील एका कोळसा व्यापाऱ्याच्या कार्यालयाजवळ काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पाठवीत त्या ठिकाणी गोंधळ घातला, तुमचं काम आम्ही बंद करणार अशी धमकी त्यांना देत, आम्हाला भेटा हे आमचं कार्ड, असे त्या व्यापाऱ्याला धमकविले.
दुसऱ्या दिवशी व्यापारी त्या महिला पदाधिकाऱ्यांचा कार्यालयात गेला असता त्यांना आधी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी धमकवीले, नंतर त्या महिलेने काम सुरू ठेवायचं असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागेल, अन्यथा काम सुरू ठेवता येणार नाही. Political leader
महिलेने त्या व्यापाऱ्याला 5 लाख रुपयांची खंडणी मागितली, पैसे कुठून द्यायचे असा पेच त्या व्यापाऱ्यासमोर निर्माण झाला, त्या राजकीय पक्षातील वरिष्ठांना याबाबत माहिती द्यायची का असा विचार त्या व्यापाऱ्यांने केला मात्र सम्पर्क काही होऊ शकला नाही. Ransom
मात्र त्या व्यापाऱ्याकडे महिलेने पैसे मागितले याबाबत पुरावे असल्याची माहिती असून लवकरचं याबाबत पोलिसांना रीतसर तक्रार तो व्यापारी नोंदविणार आहे.
आता जिल्ह्यात किंवा शहरात कुण्या व्यापाऱ्याला काम करायचं की नाही हे राजकीय पुढारी ठरवू लागले आहे, पैसे द्या काम करा असा नियम चंद्रपुरातील पुढाऱ्यांनी बनविला आहे.
एकदिवस काही व्यापारी राजकीय पुढारी यांचा नियम मोडणार असल्याची सुरुवात करणार अशी माहिती मिळाली आहे.
त्या महिला पदाधिकाऱ्यावर वरिष्ठ नेते काय कारवाई करणार याकडे आता लक्ष लागले आहे.