News34 chandrapur
चंद्रपूर - समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा रिपब्लिकन पक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समिती चंद्रपूर तसेच विविध सामाजिक, राजकीय, धार्मिक, कर्मचारी संघटनाच्या संयुक्त विद्यमाने जाहीर निषेध आंदोलन डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर चंद्रपूर येथे रविवार दिनांक २३ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११ ते ५ वाजे पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. Diksha bhumi
बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवन परिसर येथे प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात चळवळीचे ज्येष्ठ नेते अशोक निमगडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली होती, या चर्चेत चंद्रपूर येथे १६ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबसाहेब अंबेडकर यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या विनंतीला मान देऊन लाखो लोकांना बुद्ध धम्माची दिक्षा दिली.तेव्हापासूनच चंद्रपूर येथील पवित्र दिक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. पण १६ ऑक्टोबर २०२२ रोजी चंद्रपूर दिक्षाभूमी येथील दिक्षाभूमी मेमोरियल सोसायटी यांनी बुद्ध धम्माच्या तत्वज्ञान विरुद्ध विषमतावादी लोकांना पवित्र दिक्षाभूमी वर मंच उभारून बॅनर लाऊन कार्यक्रम करू दिले. यामुळे आंबेडकरी जनतेत संताप निर्माण झाला आहे. सदर घटनेचा निषेध नोंविण्यासाठी जाहीर निषेध आंदोलनात सर्व बौद्ध जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यासभेत सर्वश्री राजकुमार जवादे विशालचंद्र आलोणे,राजूभाऊ खोब्रागडे,महादेव कांबळे, अशोक सागोरे,शंकर वेल्हेकर,प्रेमदास बोरकर, माणिक जुमडे,केशव रामटेके,मुन्ना आवळे,प्रतीक डोर्लीकर,गीता रामटेके, मृणाल कांबळे,ज्योती शिवणकर,प्रेरणा करमरकर यांची उपस्थिती होती.