News34 chandrapur
चंद्रपूर - भारतीय संविधानाच्या 25 व्या कलमानुसार जैन ,बौद्ध व शीख हे हिंदूच आहेत.त्याचा राजकीय मंडळींनी सन्मान केला असता तर हे राष्ट्र आज जगातील सर्वात मोठे हिंदूराष्ट्र असते, परंतू राजकीय मंडळींनी या सर्वांना अल्पसंख्याकच्या श्रेणीत आणले.हिंदूंना अल्पसंख्यांक करण्याचे षडयंत्र राजनेत्यांचेच आहे.असे प्रतिपादन जगतगुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी केले.ते चंद्रपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना 'धर्म संगोष्टी' कार्यक्रमात बुधवार 19 ऑक्टोबरला बोलत होते.
यावेळी जगतगुरु शंकराचार्य स्वागत समितीचे भगवताचार्य मनिष महाराज,रोडमल गहलोत, अजय जयस्वाल,माजी मंत्री शोभाताई फडणवीस, राजेश बियाणी,मिलिंद कोतपल्लीवार, अमोल पत्तीवार,चंद्रकांत वासाडे, शैलेश बागला, रमेश बागला यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
शंकराचार्य स्वरस्वती पुढे म्हणाले,जगात 204 देश आहेत.यातील 54 देशात हिंदूंचे वास्तव्य आहे.जर भारत स्वतःला हिन्दूराष्ट्र घोषित करीत असेल तर हे देशही स्वतःस हिंदुराष्ट्र घोषित करण्यास वेळ लावणार नाही.देशात सेक्युलर (धर्मनिरपेक्ष) शासनतंत्र आहे.मुळात धर्मनिरपेक्ष हा फक्त शब्द आहे. कुणीच धर्मनिरपेक्ष नाही.गुणधर्म म्हणजेच धर्म.पाणी,अग्नी,डोळे आदी आपला गुणधर्म त्यागतील तर काय होईल..?डोळे आंधळे होणे,अग्नीने प्रकाश व दाह सोडणे म्हणजे धर्मनिरपेक्षता.या जगात कोणतीच वस्तू किंवा व्यक्ती धर्मनिरपेक्ष नाही.असा युक्तिवाद त्यांनी केला.
हिन्दूधर्म विज्ञाननिष्ठ आहे,इतर धर्माच्या पूर्वी सनातन हिंदूधर्म आहे.सनातन धर्माचे सिद्धांत सर्वोत्कृष्ट आहेत.मठ मंदिर राहण्याचे ठिकाण नाही तर,शिक्षा,रक्षा व सेवांचे प्रकल्प तेथून राबविले पाहिजे. वैदिक काळापासून ही परंपरा होती.म्हणून तेव्हा समाज समृद्ध व प्रगतिशील होता.सर्वांचे पूर्वज हिंदू होते,म्हणून हा देश पुन्हा हिंदुराष्ट्र व्हावा म्हणूनच प्रवास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. Jagatguru Shankaracharya Nishchalananda Saraswati in chandrapur
आपले क्षेत्र मजबूत करा
युवापिढी आज मंदिराकडे फिरकत नाही तर विदेशातील चर्चमधे पण कुणी जात नाही.याला जवाबदार आम्हीच आहोत.या पिढीला धर्म व आध्यात्म चे व्यसन लावले असते तर ते दुसऱ्या व्यसनाकडे वळले नसते.व्यसन असलेच पाहिजे, परंतु ते चांगल्या गोष्ठीचे असावे.युवापिढीने याकडे लक्ष पुरवून जिथे त्यांचे वास्तव्य आहे,ते क्षेत्र सर्व बाबतीत समृद्ध व सुंदर कसे होईल यासाठी कार्य केले पाहिजे असे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती म्हणाले.