News34 chandrapur
चंद्रपूर - NSUI चे राष्ट्रीय अध्यक्ष नीरज कुंदन व महाराष्ट्र प्रभारी नागेश करियप्पा यांनी चंद्रपूर NSUI च्या जिल्हाध्यक्ष पदी शफाक शेख यांची नियुक्ती केली आहे.
नुकतेच कांग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक संपन्न झाली, त्या निवडणुकीत जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे हे बहुमताने विजयी झाले.
यानंतर आता देशातील प्रत्येक राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर कांग्रेसची पुनर्बांधणी होणार आहे. त्याच धर्तीवर आता NSUI संघटनेत फेरबदल करण्यात येत आहे.
मागील अनेक वर्षांपासून NSUI या संघटनेत शफाक शेख यांनी सक्रिय सहभाग नोंदविला असून त्यांच्या संघटनेप्रति काम बघून NSUI च्या वरिष्ठांनी दखल घेत त्यांना जिल्हाध्यक्ष पदी विराजमान केले आहे.
याबाबत शफाक शेख यांनी आता NSUI विद्यार्थी संघटनेचे आता जिल्हा व तालुका स्तरावर वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहू असे सांगितले.
विद्यार्थ्यांच्या कसल्याही समस्येबाबत NSUI जिल्ह्यात आवाज बुलंद करणार असल्याचे ही शेख यांनी माहिती दिली.
शफाक शेख यांच्या निवडीबद्दल चंद्रपूर जिल्ह्यातील कांग्रेस नेते, वरिष्ठ पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन करीत भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.