News34 chandrapur
अमरावती/चंद्रपूर - आमदार बच्चू कडू हे तोडपाणी करणारे आहे, गुवाहाटी ला जाऊन त्यांनी करोडो रुपये लाटले असा थेट आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. अपक्ष आमदारांच्या आरोप-प्रत्यारोपावरून अमरावती जिल्ह्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.आमदार बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्या विरोधात राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. Political breaking
गुवाहाटी ला जाऊन करोडो रुपये लाटले असा आरोप रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केला होता. या आरोपांवरुनच बच्चू कडू यांनी तक्रार दाखल करत रवी राणा विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
राजकारणात 20 वर्षे मी संघर्ष केला आहे, जर मी तोडपाणी केलं असेल तर याबाबत मी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांना नोटीस पाठवीत मला पैसे दिले काय? याचा जाब कायदेशीर विचारणार असल्याची प्रतिक्रिया कडू यांनी दिली. 50 khoke
आमदार राणा यांनी जे आरोप माझ्यावर केले त्याबाबत 1 तारखेपर्यंत पुरावे द्या, जर पुरावे सिद्ध झाले तर मी राणा यांच्या घरी भांडे घासणार असे कडू म्हणाले.
मंत्री मंडळात स्थान न मिळाल्याने आधीच बच्चू कडू नाराज आहेत. त्यातच राणा यांच्या आरोपांमुळे ते चांगलेच संतापले आहेत. यामुळे बच्चू कडू यांची नाराजी शिंदे-फडणवीस सरकारला भारी पडू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.