News34 chandrapur
चंद्रपूर - Bollywood मधील Super 30 या चित्रपटाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता, त्यामधील एक संवाद "राजा का बेटा राजा नही बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा" चांगलाच लोकप्रिय झाला होता. Super30 movie
असाच एक प्रसंग 2 दिवसांपूर्वी चंद्रपुरात घडला, सामान्य कुटुंबातील ऑटो रिक्षा चालकाचा मुलगा देशातील सर्वात मोठ्या विद्यार्थी संघटन NSUI चा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष बनला, अनेक वर्षांपासून शफाक शेख NSUI मध्ये सक्रिय आहे, सामान्य कुटुंबातील सामान्य मुलगा या पदावर पोहचला याचा संघटन व कांग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्त्याना आनंद झाला. Nsui news
पण 2 दिवसानंतर शफाक शेख यांची नियुक्ती रद्द करीत यश दत्तात्रय यांची NSUI च्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.
अचानक झालेल्या या निर्णयामुळे कार्यकर्ते सुद्धा नाराज झाले.
त्यांनतर आता नेता का बेटा नेता ही बनेगा असा सूर उमटू लागला, शफाक शेख यांच पद रद्द व्हावे यासाठी चंद्रपुरातील कांग्रेस नेत्याने पक्षश्रेष्ठीवर चांगलाच दबाव आणल्याची माहिती आहे. Nsui full form
कांग्रेसच्या गटबाजीनंतर नेते आता विद्यार्थी संघटनेवर सुद्धा आपल्या मनातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी पुढे येऊ लागले आहे. Chandrapur politics
मात्र नेत्यांची ही नौटंकी अनेकांची नाराजी ओढावून घेणार आहे हे मात्र खरे.
कांग्रेस पक्षात आता नेत्यांची मुले मोठी होणार, सामान्य कार्यकर्त्यांचं काय होणार हा मोठा प्रश्न आहे.
कांग्रेस पक्षात घराणेशाहीला भविष्य आहे, पण कार्यकर्त्यांच्या नशिबी फक्त सतरंज्या.
कांग्रेसमधील महिला कांग्रेस, कांग्रेस नंतर विद्यार्थी संघटनेत सुद्धा नेत्यांच्या गटबाजीची नौटंकी पुढे अशीच वाढणार.
एकीकडे पक्षाचे नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत असून स्थानिक नेते मात्र पार्टी तोडो अभियान राबवित आहे. Bharat jodo