News34 chandrapur 
चंद्रपूर - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 153 वी जयंती व माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कोल मंत्रालय यांच्या निर्देशानुसार स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
वेकोलीच्या चंद्रपूर क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या महाव्यवस्थापक कार्यालयात क्षेत्रीय महाव्यवस्थापक मोहम्मद साबीर व अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून स्वच्छता अभियान राबविले. Western coalfields limited
मात्र या अभियानात त्यांनी एक चूक केली, ज्या ठिकाणी परिसर स्वच्छ होता त्याठिकाणी महाव्यवस्थापक साबीर यांनी आपला झाडू चालविला. Coal india
देशात स्वच्छता अभियानाची सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती, मात्र आज त्यांच्या या अभियानाची खिल्ली उडवीत वेकोलीचे अधिकारी फक्त फोटो काढण्यापूरते मर्यादित राहीले आहे.
चंद्रपूर क्षेत्रातील वेकोलीच्या वसाहतीत दुर्गंधी पसरली आहे, जागोजागी झाडे वाढलेले आहे, त्या ठिकाणी वेकोली प्रशासन लक्ष देत नाही.
पण स्वच्छता अभियानाच्या वेळी स्वच्छ परिसरात हे अधिकारी फक्त फोटो काढण्यापूरते अभियान राबवित आहे. Swachhta abhiyan
वेकोली वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी अनेकदा निवेदने दिली मात्र त्यावर वेकोली प्रशासन लक्ष देत नाही, वसाहत परिसरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले मात्र प्रशासन काही जागा झाला नाही.
आधी अस्वछतेवर प्रशासनाने झाडू चालवावा अशी मागणी नागरिक करीत आहे.

