News34 chandrapur
चंद्रपूर - साखळी उपोषणा दरम्याण इलेक्ट्रिक विभागाची कंत्राट प्रकिया पुर्ण करण्याचे आश्वासन देणा-र्या सिएसटीपीएस प्रशासनाने आश्वासनाची पुर्तता न केल्याने यंग चांदा ब्रिगेडच्या विज कामागार संघटनेच्या वतीने सिएसटीपीएसच्या गेट समोर आमरण उपोषण सुरु केले आहे. यात नितीन कार्लेकर, अतुल बोढे, देवानंद गोलटकर, विक्की देवगळे उपोषणावर बसले आहे.
Young chanda brigade
    चंद्रपूर महाओष्णीक विद्युत केंद्रातील इलेक्ट्रीक विभागाची कंत्राट निवीदा प्रक्रिया वेळेत पुर्ण न झाल्याने या विभागातील 20 कंत्राटी कामगारांवर २०२२ रोजी सदर कंत्राटच्या कामाचा कालावधी संपलेला होता. त्यानंतर पुन्हा निविदा प्रकाशित करून काम नियमित सुरु ठेवणे अपेक्षित होते. मात्र असे न करता अतिरिक्त मुदत वाढ करून काम सुरु करण्यात आले आता ४ महिणे लोटूनसुद्धा अद्यापही सदर कामाची निविदा प्रकाशित करण्यात आलेली नाही. या उलट या सर्व कंत्राटी कामगारांना कुठलीही पुर्व सुचना न देता कामावरून कमी करण्यात आले. त्यामुळे या विरोधात यंग चांदा ब्रिगेडच्या विज कामगार संघटनेच्या वतीने साखळी उपोषण सुरु करण्यात आले होते. Hunger strike
यावेळी संबधित अधिका-र्यांनी उपोषण पेंडालाला भेट देत कामगारांना कामावर घेण्याचे आश्वासन दिले होते. Cstps त्यानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र आता सिएसटीपीएसच्या अधिका-र्यांनी कामावर घेऊ मात्र कोणतेही भत्ते लागु होणार नाही अशी भुमिका घेतली आहे. हा निर्णय कामगारांवर अन्याय करणारा असल्याचे सांगत पुन्हा आज शुक्रवार पासुन यंग चांदा ब्रिगेडच्या विज कामगार संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचा इशारा यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या विज कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या विज कामगार संघटनेचे अध्यक्ष हेरमन जोसेफ, उपाध्यक्ष प्रकाश पडाल, कार्याध्यक्ष नितिन कार्लेकर, अशोक ठाकरे, सुरेश ठाकरे, प्रविन झाडे, महेश मोडमवार, मुकंदा ठाकरे यांच्यासह कामगारांची उपस्थिती होती.
