News34 chandrapur
नाशिक - प्रसिद्ध चिंतामणी ट्रॅव्हल्स चा अपघात झाल्यावर ट्रॅव्हल्स ला भीषण आग लागली, या आगीत तब्बल 10 ते 12 प्रवासी जिवंत जळाले, भीषण घटनेमुळे राज्य हादरून गेले आहे. या भीषण दुर्घटनेत 11 प्रवाश्यांचा मृत्यू तर 38 प्रवासी गंभीर जखमी झाले अशी प्राथमिक माहिती आहे.यवतमाळ जिल्ह्यातील पुसद वरून खासगी बस मुंबईच्या दिशेने निघाली होती, बस मध्ये 50 प्रवासी प्रवास करीत होते. Nashik bus accident
नाशिक जवळ पोहचताच बस व ट्रक चा अपघात झाला, अपघातानंतर बस ने पेट घेतला, बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले.
सदर अपघात हा नाशिक जवळील मिरची हॉटेलजवळ झाला, सदर रस्ता हा अपघात प्रवण म्हणून घोषित केला आहे. Chintamani Travels
नाशिक-औरंगाबाद मार्गावर घडलेल्या या आगीच्या तांडवात संपूर्ण बस जळून कोळसा झाली, औरंगाबाद रोडकडून खासगी बस येत होती, बसमध्ये किमान 50 प्रवासी होते. त्यातील 25 प्रवाशांना आम्ही जळताना पाहिलं, असंही काही प्रत्यक्षदर्शींनी म्हटलंय. अग्निशमन दल हाकेच्या अंतरावर असूनही वेळेत मदत पोहोचू शकली नाही, असा आरोपही त्यांनी केला.
मृतदेह नेण्यासाठीही रुग्णवाहिका नव्हत्या, अशीही माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. त्यामुळे सिटी बसमधून या अपघातामध्ये जिवंत जळालेल्यांचे मृतदेह नेण्याची वेळ ओढावली, असं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. Terrible road accident
काही प्रवासी जिवंत जळत असताना मदतीसाठी त्यांनी आरडाओरडा केला. बसमधील प्रवाशांच्या किंकाळ्यांनी आजूबाजूचा परिसर हादरुन गेला होता. या घटनेनं महाराष्ट्र शहारुन गेलाय. तर जिवंत जळाल्याने मृतदेहांची ओळख पटवण्याचंही आव्हान प्रशासनासमोर आहे. अपघातामुळे या बसने प्रवास करत असलेल्या प्रवाशांच्या नातलगांच्या काळजाचा ठोका चुकलाय.

