News34 chandrapur
घुग्गुस - शहरातील झाडे कॉम्प्लेक्स च्या मागील भागात 20 ऑक्टोबर ला रात्री 1 वाजताच्या सुमारास वनविभागाने मगरीचे रेस्क्यू केले. Crocodile in chandrapur
घुग्गुस परिसरात असणाऱ्या वेकोलीच्या पाणी असलेले खड्डे व जवळ असलेल्या फिश टॅंक मध्ये सदर मगर वास्तव्यास होता, याबाबत वनविभागाच्या रेस्क्यू टीम ला माहिती मिळताच त्यांनी मध्यरात्री घुग्गुस येथे पोहचून आधी फिश टॅंक पूर्ण रिकामी करीत मगरीला बाहेर काढले. Wild animals
सदर मगर ही 5.30 ते 6 फुटाची असून सध्या चंद्रपुरातील रेस्क्यू सेंटर येथे नेण्यात आली आहे.