News34 chandrapur
चंद्रपूर - कांग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशवासीयांचे लाखोंच्या संख्येत समर्थन मिळत आहे.
मात्र ही बाब भाजपच्या पचनी पडत नसल्याने राहुल गांधी यांच्या खाजगी आयुष्यावर आक्षेपार्ह टीका करीत आहे. Bharat jodo yatra
नुकतेच भारत जोडो यात्रेत बंजारा समाजातील स्त्रियांनी पारंपरिक वेशभूषा करीत राहुल गांधी यांच्यासोबत सहभागी झाले, याबाबत राहुल गांधी यांच्या फेसबुक खात्यावर तसे फोटो प्रकाशित करण्यात होते मात्र ते फोटो चंद्रपूर भाजप आयटी सेल चे फेसबुक खाते भाजपा चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्र यावरून तो फोटो प्रकाशित करीत आक्षेपार्ह टीका करण्यात आली, सदर टीका राहुल गांधी सहित बंजारा समाजातील स्त्रीयाविरोधात करून महिलांचा अपमान करण्यात आला असल्याचा आरोप चंद्रपूर NSUI ने केला आहे.
NSUI ने भाजप चंद्रपूर लोकसभा क्षेत्र या खात्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.congress rahul gandhi
NSUI चे राष्ट्रीय सचिव रोशन लाल बिट्टू यांच्या सूचनेनुसार याकूब पठाण यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारींवर पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.