News34 chandrapur
चंद्रपूर - शिवसेना ठाकरे गटातून अनेक नाराज कार्यकर्ते व पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले, काही निष्ठावंत ठाकरे गटात आजही थांबले आहे, मात्र अश्याच एका निष्ठावंत पदाधिकाऱ्याने पक्षाच्या नावावर पैश्याची मागणी केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. Political breaking
चंद्रपुरातील कोल डेपो चालक अमित अनेजा यांच्या कोल डेपोवर 12 ऑक्टोम्बरला काही 7 ते 8 लोक विना परवानगीने कोलडेपो च्या आत शिरले. Filed complent extortion
तुमचे कोलडेपो प्रदूषण वाढवीत असल्याची तक्रार आम्हाला मिळाली असल्याची बाब एका कार्यकर्त्याने अनेजा यांना सांगितली.
जाता जाता शिवसेना जिल्हा महिला संघटिका उज्वला नलगे यांचं visiting card देण्यात आले.
सायंकाळी अनेजा यांना नलगे यांनी घरी बोलाविले. Shivsena thackeray group
काम करायचे असतील तर तुम्हाला सेटलमेंट करावे लागतील अशी धमकी अनेजा यांना स्वतःला नलगे यांचा स्वीय सहायक म्हणणारा सुप्रीत वासेकर यांने दिली.
मात्र आता पैसे देणार नाही अशी ठाम भूमिका अनेजा यांनी घेतली होती.
सेटलमेंट करणार नसेल तर तुमचा कोलडेपो आम्ही बंद पाडू अशी धमकी अनेजा यांना देण्यात आली.
प्रेमाने पैसे मागितले असते तर आम्ही दिले असते पण जबरदस्ती पक्षाच्या नावावर वसुली करणार असेल तर आम्ही पैसे देणार नाही असे अनेजा यांनी सांगितले व तिथून निघून गेले. विशेष म्हणजे नलगे व अनेजा यांच्या घरी झालेल्या भेटीत आम्ही आंदोलन कसे करू शकतो व त्यानंतर काय करू शकतो असे उदाहरण देत नलगे यांनी अनेजा यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला होता. pollution
त्यानंतर सुद्धा अनेजा यांना पैश्यासाठी त्रास देण्यात आला, 15 ऑक्टोम्बरला अमित अनेजा यांनी घुग्गुस पोलीस स्टेशन गाठत उज्वला नलगे व सुप्रीत वासेकर यांचे विरोधात 5 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
उज्वला नलगे व सुप्रीत वासेकर व इतर यांच्यावर घुघुस पोलीस ठाण्यात कलम 143, 341, 385, 448 व 506 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास घुग्गुस पोलीस करीत आहे.
विशेष म्हणजे पडोली ते घुग्गूस मार्गावर कोलडेपो मागील अनेक वर्षांपासून आहे, त्यांचं प्रदूषण नलगे यांना दिसलं नाही का? ही बाब संदेह व्यक्त करणारी आहे. Coal depo
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून जनमानसात लोकप्रिय झाले मात्र काही कार्यकर्ते त्यांच्या नावाचा गैरफायदा घेत पैश्यासाठी नागरिकांना त्रास देतात ही बाब शिवसेनेसाठी भविष्यात धोक्याची घंटा ठरणार आहे.
नलगे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यावर पक्ष काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.