News34 chandrapur
चंद्रपूर - 2019 ला राज्याच्या राजकारणात निर्माण झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्याया वादळाने अनेक प्रस्थापित पक्षांची झोप उडविली होती, आता पुन्हा ते वादळ उफाळण्याच्या तयारीत आहे. VBA for India
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्यातील मनपा व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ध्येय निश्चित करीत प्रत्येक जिल्ह्यात संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात 31 ऑक्टोम्बरला वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी राज्य सरकार व पंतप्रधान मोदी यांच्यावर चांगलीच टीका केली.
Balasaheb ambedkar
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सध्याची भूमिका घेता ते गूजरात राज्याचे पंतप्रधान आहेत कि,काय असे वाटते.पंतप्रधान पत्रकार परिषद घेत नाही.प्रश्न विचारणा-यांना पेन नक्षलवादी ठरविण्याची भूमिका अतिशय घातक आहे. Narendra modi
आपला भारत देश एकसंघ आहे.असे असतांना राहूल गांधी भारत जोडो यात्रा करताहेत.देश एक असतांना भारत जोडो यात्रा कशासाठी असा सवाल उपस्थीत केला, त्यांची भारत जोडो यात्रा म्हणजे ब्लाइंड मार्च blind march आहे. वंचीत बहूजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी भाजप काँग्रेस वर जोरदार टिका केली.
पत्रकारांशी बोलतांना बाळासाहेब आंबेडकरांनी विविध मुद्यावर कटाक्ष टाकला.
राज्यातील विविध महत्वपुर्ण प्रकल्प मोदी सरकार गुजरातला घेऊन जात आहे.त्यांची हि भूमीका गुजरातचे पंतप्रधान असणारी आहे.
राज्यातील महत्त्वाचे मोठे उद्योग सरळ गुजरातला जात आहे, या वृत्तीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच अडचणीत सापडले आहे.
यावेळी माजी राज्यमंत्री रमेश गजभे व वंचित आघाडीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भूषण फुसे उपस्थित होते.