News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना न्याय मिळण्याकरिता आम आदमी पार्टी व वृषाई चे इरई नदीच्या खोलीकरणासाठी महात्मा गांधी जयंती दिनी इरई पदयात्रा व जल सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
अनेक वर्षापासून आरवट पुल ते पठानपुरा गेट-विट्ठल मंदिर-गोपालपुरी-बिनबा गेट-नागिनाबाग - सिस्टर कॉलोनी,हवेली गार्डन, वडगाव, दाताळा परिसरात इरई नदी चे पाणी पूर परिस्थितीत अनेकांच्या घरात शिरते त्यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत असतो. Water Satyagraha
पण या पूर परिस्थितीला थांबविण्याकरिता आजपर्यंत शासनाकडून खोलीकरण करण्याकरिता फक्त घोषणा केल्या जात आहे आणि छोटा मोठा फंड देऊन फक्त काम सुरू केल्या जात असते पण ते संपूर्ण काम शेवटापर्यंत नेण्यात येत नाही. त्यामुळे शासनाच्या उदासीनतेमुळे नेहमीच या परिसरात पुराची परिस्थिती निर्माण होत असते. याच परिस्थितीची आम आदमी पक्षाकडून सदर परिसरात नदी पात्रात मोठ्या प्रमाणात खोलीकरणाचे काम करण्यात यावे व विशेष निधी उपलब्ध करून खोलीकरण करून सदर परिसरातील नागरिकांना न्याय मिळावा या मागणीला घेऊन एक मोठे जल सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. Irani river
या आंदोलनात वृषाई चे कुशाब कायरकर सोबत आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार जिल्हा सचिव संतोष दोरखंडे,शहर सचिव राजू कूड़े, शहर उपाध्यक्ष सिकन्दर सागोरे,झोन अध्यक्ष सुनिल सदभय्या,शहर संगठन मंत्री सुनिल भोयर,युवा शहर अध्यक्ष संतोष बोपचे,योगेश गोखरे, सुधीर पाटिल,नागसेन लभाने,प्रदीप वाळके,सचिन खोबरागड़े,मधुकर साखरकर,डॉ सलिम तुकडी,योगेश मुरेकर, गजानन बनसोडे, अशोक माहूरकर,प्रशांत रामटेके,स्वप्निल घागरगुंडे,जितेंद्र कुमार भाटिया,आर धवले,प्रफुल मल्लेलवार,पुंडलिक गोठे, दिपक चुनारकर,रामदास साखरकर,विठ्ठल भगत,रामकृष्ण खामनकर सोबत महिला संगठन मंत्री सुजाताताई बोदेले,रुपाली टोंगे,पल्लवी घोडमारे,रेखा चाम्भारे,इंदिरा गुरुले,गीता अत्रे,प्रीति लांडे,उज्वला नान्दे,सपना चाम्भारे, सारिका जाधव,प्रतिभा कायरकर,सुजाता देठे इत्यादि उपस्थित होते.
