News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस स्टेशन व पोलीस मुख्यालय समोर 20 मे 2022 ला तब्बल 11 लाख 10 हजार रुपयांची लूटमार करण्यात आली. बाबूपेठ येथील मोनिष बघेल हे कंपनीचे पैसे काढण्यासाठी HDFC बँकेत गेले होते.
Chandrapur crime news पैसे काढल्यावर बघेल हे आपल्या चारचाकी वाहनजवळ पैसे ठेवण्याकरिता गेले असता तितक्यात 2 अज्ञात इसमानी तुमच्या गाडीचे ऑइल लिक होत आहे असे सांगितले. बघेल यांनी पैसे गाडीवर ठेवले असता, ऑइल लिक होत आहे हे बघण्यासाठी गेले असता तेवढ्यात त्यांची 11 लाखांची रोख रक्कम त्या इसमानी पळवली. Chandrapur police
Chandrapur crime news पैसे काढल्यावर बघेल हे आपल्या चारचाकी वाहनजवळ पैसे ठेवण्याकरिता गेले असता तितक्यात 2 अज्ञात इसमानी तुमच्या गाडीचे ऑइल लिक होत आहे असे सांगितले. बघेल यांनी पैसे गाडीवर ठेवले असता, ऑइल लिक होत आहे हे बघण्यासाठी गेले असता तेवढ्यात त्यांची 11 लाखांची रोख रक्कम त्या इसमानी पळवली. Chandrapur police
या घटनेनंतर रामनगर पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी केली पण आरोपीचा सुगावा लागला नाही. गुन्ह्याचे गांभीर्य बघता जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश दिले. Village of Thieves
रामनगर पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांनी सदर गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे यांना निर्देश दिले, एकरे यांनी दोन पथक तयार करीत गुन्ह्याचा तपास सुरू केला. रामनगर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक बाबीची चौकशी सुरू केली. वेळोवेळी अज्ञात आरोपींची वेगवेगळी माहिती पोलिसांना मिळत होती, त्या माहितीच्या आधारे पोलीस कधी तेलंगणा, कर्नाटक, सोलापूर या ठिकाणी आरोपींचा शोध घेतला. विविध माहिती गोळा करीत आरोपींचा सुगावा लावत त्यांना अटक केली. सदर घटनेतील 6 आरोपींना पोलिसांनी अटक केली ज्यामध्ये 2 महिलांचा सुद्धा सहभाग आहे. आरोपिकडून रोख 10 हजार रुपये, 2 दुचाकी वाहन, 3 मोबाईल व 22 मोबाईल सिम कार्ड जप्त केले. आरोपींची कसून चौकशी करण्यात आली असता पोलिसांना अवाक करणारी माहिती मिळाली. विशेष म्हणजे आरोपी 30 वर्षीय बाबू शंकररैय्या छल्ला, 28 वर्षीय अलेक्झांडवर रमेश छल्ला, 18 वर्षीय नानी नागेशराव येरगदीमल्ला, श्रीमती कल्पना किशोर कुंचाला, कुमारी बाबू गोगुला हे सर्व रा. कपराला तिप्पा, पोस्ट धामवरम, ता. बोगोले, जिल्हा नेल्लोर, राज्य आंधप्रदेश मधील निवासी आहे. सदर गावाबद्दल वेगवेगळी चर्चा आहे. या गावात चोरी करणारे अनेक आरोपी आश्रय घेतात, व कोणत्याही राज्यात चोरी करायची असल्यास आधी महिलांच्या मार्फत भाड्यावर रूम घेऊन राहतात, त्यानंतर 15 ते 20 दिवस ज्या ठिकाणी चोरी करायची आहे तिथे रेकी करतात. विशेष म्हणजे या सर्व आरोपिंचे लक्ष बँक व ज्वेलरी शॉप वर असते. ज्या नागरिकांकडून चोरी करायची आहे त्यांच्या अंगावर थुंकणे, घाण टाकणे, वाहनाचे ऑइल गळती व टायर पंचर आहे अशी बतावणी करीत घटना घडवून आणतात. सदर आरोपींनी मुलुळ, भांडुप, पनवेल, अमरावती, वरोरा चंद्रपुरात अश्या लुटमारी आरोपींनी केली आहे. रामनगर पोलिस स्टेशनमधील गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख सपोनि हर्षल एकरे व पोउपनी विनोद भुरले यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी अतोनात परिश्रम केले. यासोबत पोलीस कर्मचारी रजनीकांत पुठ्ठावार, पेतरस सिडाम, किशोर वैरागडे, प्रशांत शेंदरे, निलेश मुडे, हिरालाल गुप्ता, संदीप कामडी, भावना रामटेके, सुजित शेंडे, अमोल सावे यांनी यशस्वीपणे कारवाई केली.
