News34 chandrapur
महानगरपालिकेतर्फे घरोघरी ओला आणि सुक्या कचऱ्याचे संकलन केले जाते. मात्र, तरीही शहरात काही ठिकाणी नागरिकांकडून कचरा बाहेर फेकला जातो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून शहर अस्वच्छ होते. या प्रकारांना आळा घालण्यासाठी मनपा स्वच्छता निरीक्षकांद्वारे स्वच्छतेविषयक नियमित पाहणी करण्यात येते. स्वच्छता राखण्यास व दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी नागरिक, दुकानदार, बाजार परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. Chandrapur municipal corporation
चंद्रपूर - चंद्रपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने दुकानातील कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकल्याने माधव किड्स वेअर यांच्याकडुन दंड वसुल केला.
गुरुवार ता. १२ रात्रीच्या सुमारास मुख्य रस्त्यावर पाहणी करतांना माधव किड्स वेअर येथील दुकानाच्या आतील कचरा दुकानासमोर रस्त्यावर ढकललेला आढळुन आला त्यामुळे माधव किड्स वेअर यांना नोटीस बजावण्यात आली होती. सदर दुकानमालक यांनी पालिका कार्यालयात येऊन दंड रकमेचा भरणा केला. Garbage in the openमहानगरपालिकेतर्फे घरोघरी ओला आणि सुक्या कचऱ्याचे संकलन केले जाते. मात्र, तरीही शहरात काही ठिकाणी नागरिकांकडून कचरा बाहेर फेकला जातो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून शहर अस्वच्छ होते. या प्रकारांना आळा घालण्यासाठी मनपा स्वच्छता निरीक्षकांद्वारे स्वच्छतेविषयक नियमित पाहणी करण्यात येते. स्वच्छता राखण्यास व दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी नागरिक, दुकानदार, बाजार परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. Chandrapur municipal corporation