News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर वेकोली क्षेत्रांतर्गत येणाऱ्या महाकाली कॉलरी, लालपेठ व रयतवारी कॉलरी परिसरातील नागरिकांना अचानकपणे घर खाली करण्यासंदर्भात नोटीस देण्यात आले.
चंद्रपूर वेकोलीच्या या नोटिसमुळे नागरिक चांगलेच घाबरले आहे, सध्या लालपेठ व नुकतेच बाबूपेठ येथील बाबा नगर परिसरातील नागरिकांना 31 ऑक्टोबर च्या आत नागरिकांना घर खाली करण्याचे फर्मान दिले आहे.
विशेष म्हणजे बाबा नगर परिसरात राहणारे नागरिक मागील 40 वर्षापासून त्या परिसरात वास्तव्य करीत आहे. Chandrapur wcl
यामध्ये कामगार वर्गाची संख्या जास्त आहे, वेकोली च्या या फर्मान विरोधात राष्ट्रवादी कांग्रेसच्या शहर विभागाने कम्बर कसली असून ऐन मनपा निवडणुकीच्या तोंडावर वेकोली ला हा शहाणपणा सुचला कसा असा प्रश्न पत्रकार परिषदेत राजीव कक्कड यांनी उपस्थित केला आहे.
सध्या पोस्टाद्वारे नागरिकांना नोटीस प्राप्त होत असून त्यामध्ये वेकोलीच्या सर्व्हे नंबर 423 मध्ये नागरिकांनी अवैध अतिक्रमण केल्याचा उल्लेख आहे, तुम्ही राहत असलेल्या जागेचा पुरावा वेकोली कार्यालयात सादर करावा असे आवाहन वेकोली प्रशासनाने केले आहे. Ncp news
मात्र राजीव कक्कड यांनी हा नोटिसचा प्रकार म्हणजे राजकारणाचा एक भाग असल्याचा आरोप केला आहे, त्या भागात भाजप नगरसेवक कधी निवडून आला नाही त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी नागरिकांना बेघर करण्याचा कट रचला असा आरोप यावेळी केला. विशेष म्हणजे ज्या कलमांचा आधार वेकोली प्रशासनाने घेतला आहे त्या कलमांचा वापर कुणी तक्रार केली असल्यास त्यावेळी करता येतो, म्हणजे यामागे कुणीतरी राजकीय नेता असणार अशी शंका कक्कड यांनी यावेळी व्यक्त केली.
घरे खाली केल्यावर नागरिकांच्या पुनर्वसन बाबत काय? ते कुटुंब राहणार तरी कुठे? असं कुठलाही नियोजन न करता सदर प्रकार राजकीय दबावातून केला असल्याचा आरोप कक्कड यांनी केला आहे.
आयोजित पत्रकार परिषदेत चारुशीला बारसागडे व सुनील काळे यांची उपस्थिती होती.