News34 chandrapur
चंद्रपूर - वेकोली चंद्रपूर क्षेत्रातील DRC -3 खाणीतील व्यवस्थापक दिनेश कराडे हे 5 हजार रुपयांची लाच घेताना CBI ने रंगेहात अटक केली.
प्राप्त माहितीनुसार वेकोली कर्मचाऱ्याला पगारी ड्युटी देण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागितली, मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने वेकोली कर्मचाऱ्याने याबाबत नागपूर CBI लाचलुचपत विभागात तक्रार दिली.
तक्रारीची पडताळणी केल्यावर CBI च्या चमूने 14 ऑक्टोम्बरला DRC येथील कराडे यांच्या निवासस्थानी धाड मारली. CBI RAID CHANDRAPUR
त्यानंतर वेकोली चंद्रपूर क्षेत्रातील दुर्गापूर VIP गेस्ट हाऊस मध्ये पुढील कारवाईसाठी कराडे यांना नेण्यात आले.
कारवाई दरम्यान वेकोली क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी व कामगार युनियन चे पदाधिकारी उपस्थित होते. WCL
CBI मधील अधिकाऱ्याने याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की चंद्रपूर सहित आमच्या चमूने नागपूर व छिंदवाडा येथे छापामार कारवाई केली.
चंद्रपूर वेकोली कार्यालयात काही महत्वपूर्ण कागदपत्रे जप्त करण्यात आले आहे.
सदर लाचखोर अधिकाऱ्यांचे बँक खात्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
सदर यशस्वी कारवाई DIG खान यांच्या मार्गदर्शनात DYSP संदीप चौगुले, दिनेश तडसे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक RP सिंग, JK मोहन, किरण वरठे आदींनी केली.
7 ऑक्टोम्बरला वणी क्षेत्रातील ताडाळी येथील अधिकाऱ्याला 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती.
एका आठवड्यात CBI ची ही दुसरी कारवाई असून या कारवाईमुळे वेकोली क्षेत्रातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.